एक्स्प्लोर

औरंगाबाद जाळपोळ : 'सामना'तून सरकारवरही निशाणा

दोन गटांमध्ये झालेल्या वादात औरंगाबाद शहरात जाळपोळ झाली आणि यामुळे मोठं नुकसान झालं. जाळपोळ आणि दगडफेकीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

औरंगाबाद : दोन गटांमध्ये झालेल्या वादात औरंगाबाद शहरात जाळपोळ झाली आणि यामुळे मोठं नुकसान झालं. जाळपोळ आणि दगडफेकीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले. हा भडका का उडाला, याची कारणं शोधण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ने म्हटलं आहे. सामना अग्रलेख संभाजीनगरचा भडका का उडाला? संभाजीनगरची दंगल जातीय, धार्मिक की आणखी काही? त्यात आम्हाला पडायचे नाही, पण शहरातील अनेक मोहल्ले कोणत्याही दंगलीसाठी सदैव सज्ज आहेत हे पुन्हा दिसले. संभाजीनगरचा भडका का उडाला या प्रश्नाचे खरे उत्तर शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे. आंबा, मोबाईल, पानटपरी ही दंगल भडकण्याची कारणे ठरू नयेत. पापी औरंग्याचे थडगे तेथे आहे व त्या थडग्यावर जाऊन राजकारणी गुडघे टेकतात, नमाज पढतात, हे भडकण्याचे कारण ठरले असते तर आम्हाला आनंद झाला असता. संभाजीनगरात दंगलीचा भडका उडाला असून हिंसाचारात दोन जण  ठार झाले आहेत. दंगल सरळ सरळ जातीय आहे. हिंदू व मुसलमानात उडालेला हा भडका असून शहराचे जनजीवन साफ विस्कळीत झाले आहे. या दंगलीचे नेमके कारण काय? दंगलीस जबाबदार कोण? भडका उडाला, पण ठिणगी नक्की कोठे उडाली? याबाबत संभ्रम आहे. दंगल भडकण्याची चार कारणे समोर आली, ती हास्यास्पद आहेत. १) शहरात अनधिकृत नळ कनेक्शन जोडणी व तोडण्यावरून किरकोळ वाद झाला व त्यातून पेटवापेटवी झाली. २) गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाईल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून दंगल पेटली. ३) आठ दिवसांपूर्वी शहरातील शहागंज भागात उन्मेष हुलिए या राजाबाजार येथे राहणाऱया तरुणाने एकाकडून आंबे विकत घेतले. ते आंबे खराब निघाल्यामुळे तो हे आंबे परत करण्यास गेला. तेव्हा दुकानदाराने ते आंबे फेकून देऊन उन्मेषला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला व दंगल पेटली. ४) पानपट्टीच्या अनधिकृत टपऱया हटवल्याने लोकं चिडली व दंगलीस सुरुवात झाली. अशी विविध कारणे आता समोर आली आहेत, पण आंबे, मोबाईल, पानाची टपरी अशा किरकोळ कारणांवरून दंगल व्हावी आणि जान मालाचे शेकडो कोटींचे नुकसान व्हावे हे काही योग्य नाही. ही कारणे पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्राची राखरांगोळी झालीच आहे. नगरमधील खुना-खुनीचे शिंतोडेही मंत्रालयाच्या भिंतीवर उडाले आहेत व मुख्यमंत्री म्हणतात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. संभाजीनगरात आजही जमावबंदी आहे. शहर पेटवणारे नक्की कोण आहेत याच्या चौकशा व त्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समित्या निरर्थक आहेत. आजही औरंग्याची व निजामाची वंशावळ येथे थैमान घालते आहे असाच या दंगलीचा अर्थ. शहागंजची बाजारपेठ पूर्ण पेटवली गेली. पाचशेहून जास्त वाहने, घरे व दुकाने पेटविण्यात आली. शहागंज परिसरात जगनलाल छगनलाल बन्सिले या ७० वर्षांच्या आजारी वृद्धास धर्मांध दंगलखोरांनी जिवंत जाळले. ही इतकी मस्ती व माज या लोकांत येतो कोठून? पंतप्रधान मोदी नेपाळातील मंदिरात ‘हिंदू-हिंदू’ असे प्रदर्शन करीत असताना संभाजीनगरात औरंगाबादवाल्यांनी हे असे निर्घृण हल्ले केले. संभाजीनगरात गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठय़ा संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाही असा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय? पोलिसांना नेतृत्व नाही, त्यामुळे ते दिशाहीन झाले आहेत. संभाजीनगरमध्ये अनेक गल्ल्या व मोहल्ले असे आहेत की, तेथे सैतानही जायला धजावणार नाही. अशा भागांमध्ये जिवावर उदार होऊन घुसलेल्या पोलिसांवर दंगलखोरांनी हल्ले केले. हे हल्ले ठरवून झाले व ज्या पद्धतीने पंधरा मिनिटांत पेट्रोल बॉम्बचे हल्ले सुरू झाले ते पाहता दंगलीची पूर्वतयारी झालीच होती हे उघड आहे. राज्यातील गुन्हेगारीचे थैमान पाहता कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही शब्दांना महाराष्ट्रातून जणू तडीपार केले गेले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात राज्य पेटले असताना सरकार अजगरासारखे निपचित पडून होते. तेथे बंदुकांचे बार उडाले नाहीत व कुणावर लाठी उगारली गेली नाही, पण संभाजीनगरात पोलीस आयुक्त हजर नसताना पोलिसांनी गोळीबार केला. हेसुद्धा कायदा-सुव्यवस्थेचे गौडबंगाल आहे. संभाजीनगरची दंगल जातीय, धार्मिक की आणखी काही? त्यात आम्हाला पडायचे नाही, पण शहरातील अनेक मोहल्ले कोणत्याही दंगलीसाठी सदैव सज्ज आहेत हे पुन्हा दिसले. संभाजीनगरचा भडका का उडाला या प्रश्नाचे खरे उत्तर शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे. आंबा, मोबाईल, पानटपरी ही दंगल भडकण्याची कारणे ठरू नयेत. पापी औरंग्याचे थडगे तेथे आहे व त्या थडग्यावर जाऊन राजकारणी गुडघे टेकतात, नमाज पढतात, हे भडकण्याचे कारण ठरले असते तर आम्हाला आनंद झाला असता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget