एक्स्प्लोर

रितेश देशमुखचा माफीनामा, छत्रपती संभाजीराजे म्हणतात....

रितेश देशमुखच्या माफीनाम्यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: अभिनेता रितेश देशमुखने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर चढून फोटो काढल्याने, त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. या टीकेनंतर रितेश देशमुखे जाहीर माफी मागितली आहे. रितेश देशमुखच्या या माफीनाम्यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करुन फोटोसेशन करणं खरोखरच निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली. तसंच आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून, त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील, असंही नमूद केलं. संभाजीराजेंनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. संभाजीराजे काय म्हणाले? रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे. आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील. काय आहे संपूर्ण प्रकरण? रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुखने, चौफेर टीकेनंतर माफीनामा सादर केला. कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. केवळ भक्तीभावनेतून फोटो काढले. पण यामुळे जर कोणीही दुखावलं असेल तर त्यांची मी अंत:करणापासून माफी मागतो, असं रितेश देशमुखने म्हटलं आहे. अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, पानिपतकार लेखक विश्वास पाटील आणि सहकारी 5 जुलै रोजी रायगडावर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी मेघडंबरीत चढून फोटो काढले होते. ते फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले होते. मात्र मेघडंबरीवर चढून फोटो काढल्याने रितेश देशमुखवर तुफान टीका होत होती. सोशल मीडियावर अनेकांनी रितेश देशमुखवर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर रितेश देशमुखने माफीनामा सादर केला. रितेश देशमुखचा माफीनामा आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महारांजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तीभाव होता. ती छायाचित्रे घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करपूर्वक माफी मागतो. संबंधित बातम्या   चौफेर टीकेनंतर रितेश देशमुखचा माफीनामा   फोटो - मेघडंबरीतील फोटोसेशनमुळे टीका, रितेश देशमुखचा माफीनामा 

महत्त्वाच्या बातम्या

फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget