एक्स्प्लोर

तुळजापूर संस्थानमध्ये 8.43 कोटींचा भ्रष्टाचार, तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे आदेश

याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

धाराशिव : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या (Tuljapur) 1991 ते 2009 या काळातील जवळपास आठ कोटी 43 लाखांच्या भ्रष्टाचारप्रकरणी (Corruption) राज्य गुन्हे विभागाच्या (सीआयडी) (CID) अहवालानुसार तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे, आता संबंधित विश्वस्तांवर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. 

याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार तुळजा भवानी मंदिर संस्थानमध्ये 1991 ते 2009 या कालावधीत भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भाने एक याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सहधर्मादाय आयुक्तांनी 2010 मध्ये काही आदेश केले होते. त्यात दानपेटीचा लिलाव पद्धत बंद करण्याचेही निर्देश होते. दरम्यान 2015 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावरील सुनावणीवेळी खंडपीठाने वरील प्रकरणात सरकारने सी आय डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी, असे सांगितले. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर सीआयडीने 27 ऑक्टो 2017 ला शासनाला 8.43 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अहवाल पाठवला. संबंधित अहवाल हा सांखिकी अधिकारी व लेखापरिक्षणाच्या आधारे, हा अहवाल असल्याचे नमूद करण्यात आले होते.

विशेष म्हणजे अधिवेशना काळात या प्रकरणाचा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित करण्यात आला होता. 2017 च्या जनहित याचिकेच्या सुनावणीवर खंडपीठाने तत्कालीन विश्वस्तांवर सीआयडीच्या अहवालानुसार गुन्हे दाखल करावेत आणि तपास सीआयडीच्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करावा, असे आदेशही दिले आहेत. त्यामुळे, आता तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टच्या तत्कालीन विश्वासांवर कारवाईची मोठी टांगती तलवार असल्याचं दिसून येते. 

हेही वाचा

धोतर सोडून गावच्या भरचौकात अपमानित केलं, आजोबांनी उचललं टोकाचं पाऊल, चौघांविरुद्ध 306 अन्वये गुन्हा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
Mumbai Drug : सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget