एक्स्प्लोर

Maratha Reservation : चर्चा नकारात्मक झाली तर पुढे काय होईल हे मी सांगायची गरज नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) काल कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची बैठक आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी काल कोल्हापुरात पाहिलं मूक आंदोलन झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीला संभाजीराजे यांच्याबरोबर राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत. 

आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीबाबत सरकार सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे चर्चा देखील सकारात्मक होईल अशी आशा आहे. जर चर्चा नकारात्मक झाली तर पुढे काय होईल हे मी सांगायला नको असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "सरकार सध्या तरी सकारात्मक दिसत आहेत. मराठा समाजाच्या मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत. पुन्हा नव्याने काही सांगायची गरज नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही ठेवलेल्या मागण्या मान्य करुन सरकारने मराठा समाजातील तरुणांना दिलासा द्यावा."

36 जिल्ह्यात आंदोलन करायची इच्छा नाही
कोल्हापुरात ज्या पद्धतीने मूक आंदोलन झालं तशाच पद्धतीने राज्यात सर्व ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड याठिकाणी मूक आंदोलन होणार आहे. मात्र आज मागण्या मान्य केल्या तर आम्हाला आंदोलन करण्याऐवजी आनंदोत्सव साजरा देखील करु असही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

आज होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अशोक चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत. आज पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी संभाजीराजे कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच राज्यभरातील समन्वयक आज मुंबईत दाखल झाले आहेत.

कोल्हापूरमध्ये काल राजर्षी  शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व कुटुंबीय देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
राजकारणाच्या खेळखंडोबात सोन्यासारखा माणूस गेला, आता NDA मध्ये येण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? मिटकरींचा थेट सवाल
राजकारणाच्या खेळखंडोबात सोन्यासारखा माणूस गेला, आता NDA मध्ये येण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? मिटकरींचा थेट सवाल
NDA मध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवारांशी अनेकदा चर्चा केली, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
NDA मध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवारांशी अनेकदा चर्चा केली, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवारांनी धोका दिलाय, आम्हाला मविआत ढकलून ते पळून गेलेत, वसंतदादांपासून त्यांची हिस्ट्री माहितीय, खैरेंना संताप अनावर
शरद पवारांनी धोका दिलाय, आम्हाला मविआत ढकलून ते पळून गेलेत, वसंतदादांपासून त्यांची हिस्ट्री माहितीय, खैरेंना संताप अनावर

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Embed widget