एक्स्प्लोर

साईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; पाथरीकरांना निमंत्रण नाही

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे.

शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. काल संध्याकाळी शिर्डीत पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिक आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. या चर्चेत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. तसेच आज शिर्डीकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला जाणार असले, तरी पाथरीकरांना मात्र आजच्या चर्चेचं निमंत्रण नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ : शिर्डीकरांचा बंद मागे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा बंद | शिर्डी

आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद मिटणार की नाही, हे आजच्या बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बंद मागे घेतला असला तरीही वाद अद्याप मिटलेला नाही. तसेच या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं आहे.

जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे आज शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारत पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं संबोधत या परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा शिर्डीकरांनी जोरदार विरोध करत बंद पुकारण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन साई जन्मस्थानाचा वाद मिटवण्याचा भुजबळांचा सल्ला

काय आहे पाथरीकरांचा दावा?

पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थाननं 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावानं करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलं आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचादेखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे.

1972 ते 75 मध्ये साईचरित्राची आठवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर पाथरी संस्थानचे विश्वस्त विश्वासराव खेर आणि सीताराम धानू हे द्वयी शिर्डी संस्थानचेही विश्वस्त होते. त्यामुळे सदर प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. याबाबत संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे म्हणाले की, आठवी आवृत्ती गायब आहे, याबाबत आम्हाला आताच माहिती मिळाली आहे, आम्ही यावर चौकशी करणार आहोत.

शिर्डी संस्थानने साईचरित्राच्या आतापर्यंत 36 आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. त्यापैकी नेमकी आठवी आवृत्ती मंदिर संस्थानच्या दप्तरांमधून गहाळ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे इतक्या आवृत्त्यांपैकी केवळ आठवी आवृत्तीच कशी गायब झाली? असा सवाल पाथरीकर उपस्थित करत आहेत.

दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून साई बाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन मध्यरात्रीपासून शिर्डीत बेमुदत बंद पाळण्यात आला होता. शिर्डी परिसरातील जवळपास 30 गावांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदमध्ये साईमंदिर मात्र भाविकांसाठी सुरू ठेवण्यात आलं होतं. दुसरीकडे शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदला परभणी आणि पाथरीकरांनी साई जागराने प्रत्युत्तर दिलं होतं. साईंच्या भजन आणि किर्तनात पाथरीकर दंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या साई जागर आंदोलनात शिवसेना खासदार संजय जाधवही सहभागी झाले होते. जन्मस्थळाचा वाद निर्माण न करता शिर्डीकरांनी सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना पाथरीकरांनी केली होती.

संबंधित बातम्या : 

Shirdi SaiBaba Birthplace Conflict | साईंच्या जन्मस्थळाच्या वादामुळं पुकारलेला शिर्डी बंद मागे

Shirdi Sai Baba | साई चरित्रामधील जन्मस्थळाचा उल्लेख असलेली आवृत्ती गायब

'पाथरी'करांकडे असलेले साई जन्मभूमीबाबतचे महत्वाचे पुरावे कोणते?

आजपासून शिर्डीत बेमुदत बंद, पाथरीला साईबाबांचं जन्मस्थळ घोषित करण्यास तीव्र विरोध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget