एक्स्प्लोर

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी पुन्हा चर्चेत; 'पाथरी'ला गावकऱ्यांचा विरोध

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी गावाचा उल्लेख केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिर्डी : जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे साईबाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. साईबाबांच्या जन्मस्थानच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता याला शिर्डी ग्रामस्थ विरोध करताना दिसत आहेत. गावच्या विकासाला विरोध नाही, मात्र जन्मस्थानाला विरोध आहे. दरम्यान, विरोध तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागल्यानं आता सरकार काय भूमिका घेणार याकडं साईभक्तांच लक्ष लागलं आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईंचं दर्शन घेतल्यावर आपल्या भाषणात साईंचा जन्म पाथरी या गावी झाल्याचं वक्तव्य केले होतं. त्याचवेळी साईंच्या जन्मस्थानचा मुद्दा निर्माण झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत राष्ट्रपतींना निवेदन देऊन आपला विरोध दर्शविला होता. आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा साईबाबांच्या जन्मस्थळाचा पाथरी असा उल्लेख करीत निधी देण्याची घोषणा केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. एखाद्या गावच्या विकासाला निधी देणार असला तर हरकत नाही. मात्र, साईंचं जन्मस्थान म्हणून जर विकास होणार असेल तर त्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी घेतली आहे. दरम्यान खरंच साईंचा जन्म कुठे झाला आहे? साईबाबा कुठून आले? याबाबत अधिक जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला. साईबाबा आगमन ते समाधी शताब्दी यावर शिर्डी गेझेटिअर(अनटोल्ड स्टोरी )या पुस्तकाचे लेखक प्रमोद आहेर यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया घेतली. मात्र, त्यांनीही हा दावा फेटाळून लावत साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत अनेक ठिकाणचे दावे यापूर्वी झाले असल्याचं सांगितलं. जर वारंवार असा वाद निर्माण झाला तर साईंच्या सर्वधर्मसमभाव या संदेशाला हरताळ फासला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज - साईबाबांचे जन्मस्थान पाथरी(जि. परभणी)हे असून राज्य सरकारने त्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे शिर्डीतील साईभक्तांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले होते. संबंधित बातम्या - शिर्डी : साईंच्या जन्मस्थळ वादावर संस्थान अध्यक्ष, ग्रामस्थ राष्ट्रपतींच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget