एक्स्प्लोर

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच साई चरणी करोडोंचं दान, 11 दिवसात 17 कोटी अर्पण

साईबाबांच्‍या समाधीचं 23 डिसेंबर ते दिनांक 2 जानेवारी 2020 या काळात सुमारे 8 लाख साईभक्‍तांनी दर्शन घेतलं. या अकरा दिवसात आलेल्या साईभक्तांनी सुमारे 16 कोटी 93 लाख रुपयांचे दान साईचरणी अर्पण केलं आहे.

शिर्डी : ख्रिसमस सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या झोळीत भरभरुन दान दिलं आहे. गेल्या अकरा दिवसात आलेल्या साईभक्तांनी जवळपास 16 कोटी 93 लाख रुपये साईचरणी अर्पण केले आहेत. याशिवाय सोने-चांदीचाही दानात समावेश आहे. यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा तीन कोटींनी दानात वाढ झाली असून देशात आर्थिक मंदी असताना साईंच्या झोळीत मात्र कोटींचे दान प्राप्त झालं आहे.

साईबाबांच्‍या समाधीचं 23 डिसेंबर ते दिनांक 2 जानेवारी 2020 या काळात सुमारे 8 लाख साईभक्‍तांनी दर्शन घेतलं. या अकरा दिवसात आलेल्या साईभक्तांनी सुमारे 16 कोटी 93 लाख रुपयांचे दान साईचरणी अर्पण केलं आहे. याशिवाय 1.2 किलो सोनं आणि 17 किलो चांदी साईबाबांना अर्पण केली आहे. मागील 2019 या वर्षात साईंच्या झोळीत 292 कोटी रुपये दानाच्या स्वरूपात प्राप्त झाले असून दिवसेंदिवस साईंच्या दानात वाढ होत असून 2300 कोटींच्या ठेवी विविध बँकांत जमा असल्याची माहिती साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक येतात व आपल्या ऐपतीप्रमाणे दान करतात.

देशात आर्थिक मंदीची स्थिती असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात वाढ झाली आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या केलेल्या दानात अमेरिकन डॉलर, चीन, सिंगापूर, न्यूझीलंड, कुवेतमधील चलनाचा समावेश आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारेही 1 कोटी 38 लाखांचं दान आलं आहे.

साईचरणी आलेल्या दानाचं स्वरुप

दक्षिणा पेटी - 9 कोटी 54 लाख रुपये

देगणी कांऊटर - 3 कोटी 46 लाख रुपये

चेक, डीडी, मनी ऑर्डर - 1 कोटी 51 लाख रुपये

डेबिट/ क्रेडिट कार्ड - 1 कोटी 38 लाख रुपये

ऑनलाईन देणगी - 73 लाख रुपये

परकीय चलन - 24 लाख रुपये

सोने (1213 ग्रॅम) - 42 लाख रुपये

चांदी (17 किलो)- 24 लाख रुपये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महावीर जयंतीच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचं उल्लंघन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवींसानंतर एकनाथ शिंदेंचं भाषण, नेमकं काय घडलं?
महावीर जयंतीच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचं उल्लंघन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवींसानंतर एकनाथ शिंदेंचं भाषण, नेमकं काय घडलं?
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Embed widget