Sadanand Sule : "मला माझ्या पत्नीचा अभिमान", चंद्रकांत पाटलांच्या टीकेला सदानंद सुळे यांचे उत्तर
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली. या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनीही यावर तीव्र संताप व्यक्त करून ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सुप्रियांबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं की हे स्त्रीद्वेषी आहेत. जिथं शक्य होईल तिथं महिलांचा अपमान करतात...मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे...आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे... देशातल्या इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे... चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय.
This is the Maharashtra BJP President https://t.co/eu2TYNvsDZ speaking about Supriya….I have always maintained that they (BJP) are misogynistic and demean women whenever they can…
— sadanandsule (@sadanandsule) May 25, 2022
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणावरून टीकेची झोड एकमेकांवर उठवली जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली. सुप्रिया सुळेंवर पाटलांनी टीका केली आहे. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आमचं सरकार दडपशाहीचं नाही. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या वक्तव्यावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना वाटलं, ते बोलले. मी त्यांचा इतका काही विचार करत नाही.
संबंधित बातम्या :























