Sadabhau Khot : सदाभाऊ तुम्हाला हे शोभतं का?... सिग्नलवर गाडी थांबली आणि सदाभाऊ भर रस्त्यात दोनवेळा पचकन थुंकले
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत योजना (Swachh Bharat Mission) सुरू केली, तर दुसरीकडे त्यांच्याच सहकारी पक्षाच्या नेत्याने रस्त्यावर थुंकून या योजनेचा बोजवारा उडवल्याचं चित्र आहे.
Sadabhau Khot Latest News: 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' ही म्हण आपल्या सर्वांना माहितच आहे. पण आता ही म्हण सांगायचं कारण म्हणजे राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्यं. लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना स्वच्छता पाळण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे संदेश देतात. पण स्वतः मात्र त्याचं पालन करत नाहीत. सदाभाऊ खोत यांनीही तेच केलं. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात सदाभाऊ खोत गाडीचा दरवाजा खोलून थुंकताना दिसले. ते ही एकदा नाही तर दोन वेळा. ही दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर एकच प्रश्न विचारावा वाटतो. सदाभाऊ तुम्हाला हे शोभतं का?
दक्षिण मुंबईत सिग्नलवर (South Mumbai Signal) सदाभाऊंची इनोवा गाडी थांबली आणि सदाभाऊं गाडीचा दरवाजा उघडून दोनदा रस्त्यावर थुंकले. राज्याच्या एका माजी मंत्र्याने आणि लोकप्रतिनिधीने हे असं वागलं तर सर्वसामान्यांनी काय करायचं असा सवाल उपस्थित होतोय.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत योजना (Swachh Bharat Mission) सुरू केली, तर दुसरीकडे त्यांच्याच सहकारी पक्षाच्या नेत्याने रस्त्यावर थुंकून या योजनेचा बोजवारा उडवल्याचं चित्र आहे. नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये म्हणून राज्य सरकार मोहीम राबवतं, त्या-त्या ठिकाणचे प्रशासन स्वच्छतेचे संदेश देत नागरिकांनी असं करू नये यासाठी प्रयत्न करते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. सर्वसामान्यांकडून हा दंड वसूल केला जातो. आता राज्याच्या माजी मंत्र्याने रस्त्यावर थुंकून नियमांची पायमल्ली केली केल्याचं दिसून आलं.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना सदाभाऊ खोत हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनात उडी घेतली. या दोघांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात ठिय्या मांडला आणि उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरले. मात्र मविआ सरकार जावून शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मात्र एसटीच्या विलिनीकरणाच्या बाबतीत तितका आग्रह धरला नसल्याचं दिसून येतंय. सदाभाऊ खोत यांच्या बदललेल्या भूमिकेवर विरोधकांनी चांगलीच टीका केली. आता रस्त्यावर थुंकण्याच्या या प्रकारानंतरही सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
ही बातमी वाचा: