एक्स्प्लोर
वेल प्लेड, लवकरच भेटू, बीडच्या जबरा फॅनला सचिनचं आश्वासन
बीडचे राजूदास राठोड केबीसीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांना सचिनबाबत प्रश्न विचारण्यात आला. मी सचिनचा सर्वात मोठा चाहता आहे. या प्रश्नाचं उत्तर चुकूच शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
![वेल प्लेड, लवकरच भेटू, बीडच्या जबरा फॅनला सचिनचं आश्वासन Sachin Give Promise To Meet His Fan Rajudas Rathore Who Participated In Kbc वेल प्लेड, लवकरच भेटू, बीडच्या जबरा फॅनला सचिनचं आश्वासन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05104257/sachin-rajudas-rathod.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बीडच्या राजूदास राठोड यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीमध्ये प्रश्नांना सडेतोड उत्तर देत 25 लाख रुपये जिंकले. यामध्ये राजूदास यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना अवघ्या काही सेकंदाचा वेळ घेत त्यांनी अचूक उत्तर दिलं.
सचिनला वेगवान गोलंदाज बनायचं होतं. त्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज डेनीस लिली यांच्याकडे प्रशिक्षणाची मागणी केली. मात्र तू फलंदाजीवर लक्ष दे, असं म्हणत त्यांनी सचिनला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण देण्यास नकार दिला. याबाबतचा प्रश्न राजूदास यांना विचारण्यात आला होता.
जेव्हापासून क्रिकेट कळायला लागलं तेव्हापासून सचिनचा चाहता आहे. सचिन खेळायला येणार असेल तर सामना सुरु होण्याच्या अगोदर एक तासापासूनच बसायचो. सचिनने सगळ्यात जास्त आनंद दिला आहे. आणि दुःखही त्यानेच जास्त दिले आहेत. मुलीला कार्टून पाहायचे होते आणि मला क्रिकेट पाहायचं होतं. तर त्यावेळी रागात रिमोट फोडला. सचिनला एकदा भेटण्याची इच्छा आहे, असं राजूदास राठोड म्हणाले.
सचिननेही या चाहत्याची इच्छा पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. ‘वेल प्लेड राजूदास राठोड, तुमच्या गप्पा ऐकून चांगलं वाटलं. अपेक्षा आहे तुम्ही आणखी रिमोट फोडणार नाही. लवकरच भेटू, असं आश्वासन सचिनने दिलं आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/915794019178897408
कोण आहेत राजूदास राठोड?
राजूदास राठोड हे बीड जिल्ह्यातील असून ते शिक्षक आहेत. त्यांची पत्नी अश्विनी राठोडसह ते केबीसीमध्ये सहभागी झाले होते. राजूदास राठोड एका ऊसतोड कामगार कुटुंबातील आहे. सामाजिक कार्यातही त्यांचा तेवढाच सहभाग आहे. गावातील ऊसतोड कामगाराच्या 30 मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या राहण्याची-खाण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)