(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, रुपाली चाकणकरांचे सुप्रिया सुळेंवर तिखट वार; या कंपनीचं बनवलं डायरेक्टर
Rupali Chakankar on Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीखासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
Rupali Chakankar on Supriya Sule : विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचचं सरकार सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जातेय. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केलीय जातेय. याच मुद्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका. जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा. जनतेने तुम्हाला का नाकारले आहे, यावर चिंतन करा.कारण सध्या तुमच अस झालय "सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही." अशा शब्दात चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती.
फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्ट सुप्रिया सुळे...
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 27, 2024
आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका..जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा..जनतेने तुम्हाला का नाकारले आहे यावर चिंतन करा.
कारण सध्या तुमच अस झालय "सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही."@mahancpspeaks |…
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन महायुती उभी राहिली आहे. त्याला यश मिळालं असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांचा चेहरा घेऊनच सगळे जनतेसमोर गेले होते असेही सुळे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांभा भाजपने कोणत्याही प्रकारचा शब्द दिला नव्हता, असे भाजपचे नेते म्हणत आहेत, याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, शब्द दिला होता की नाही हे मला माहित नाही. पण 2019 साली उद्धव ठाकरे हेच सांगत होते की, मला शब्द दिला होता. पण उद्दव ठाकरे शब्द दिला नाही म्हणत आहेत असे सुळे म्हणाले.
29 नोव्हेंबरला होणार नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी हा येत्या 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य : एकनाथ शिंदे
दरम्यान, आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदावरीला दावा सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात जनतेनं खूप प्रमे दिलं आहे. माझ्याएवढं प्रेम कोणालाही मिळालं नसल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.