Nagpur : नागपुरात पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
Nagpur : पतंग पकडण्यासाठीही धावणाऱ्यांच्या अनेकवेळा अंगाशी येत असल्याच्या अनेक घटना शहरात यापूर्वी घडल्या आहेत. असाच प्रकार नागपूरच्या कुंभारटोली परिसरालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडला आहे.
![Nagpur : नागपुरात पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू Running after a kite in Nagpur was hit by a train The unfortunate death of a 13 year old boy Nagpur : नागपुरात पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/c6bb9d034e71e282421c9f885cff35951673692991643440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : एकीकडे शहरात नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर बेतला असताना पतंगाच्या मागे धावताना एका 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर घडली. संक्रांतीनिमित्त आभाळ पतंगांमुळं भरुन गेलं आहे. तर दुसरीकडे एकमेकांच्या पतंग कापण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही कटलेली पतंग पकडण्यासाठीही जिवाची पर्वा न करता मागे धावणाऱ्यांच्याही अनेकवेळा अंगाशी येत असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. असाच प्रकार कुंभारटोली परिसरालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडला आहे.
आकाशात सुरु असलेल्या पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. तसेच कट झालेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभाम पळत सुटायची. असाच एक पतंग कट झाला आणि त्याला पकडण्यासाठी मुलांचा टोळका पतंग जात असलेल्या दिशेने पळत सुटला. दरम्यान रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे रुळावरुन ही पतंग जाऊ लागला. हा पतंग आपण पकडू या जिद्दीने एक 13 वर्षीय मुलगा त्या दिशेने धावू लागला होता. मात्र या दरम्यान मार्गातून एक रेल्वे गाडी जात होती. मात्र पतंग लुटण्याच्या नादात या मुलाचे येणाऱ्या रेल्वेकडेही लक्ष गेले नाही. तेवढ्यात तो रेल्वेला धडकला आणि कोसळला. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे.
यशवंत एक्स्प्रेसची जोरदार धडक लागल्याने ध्रुव धुर्वेचा जागीच मृत्यू झाला. घरातील लोक कामावर गेले असताना ध्रुवसोबतची घटना घडली आहे. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिस (Nagpur Police) पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत तरुणी गंभीर जखमी
नायलॉन मांजामुळे घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सक्करदरा परिसरातून पायी जात असताना तिच्या पायात मांजा अडकला. मांजा काढत असतानाच एक वाहन बाजूला जात होते. त्यात मांजा गुंतला अन् तरुणीच्या पायाचे हाडच या मांजाने कापले. आठवडाभरात मांजाने शहरातील तीन जण जखमी झाले आहेत. यात एका 7 वर्षाच्या चिमुकलीचा गळा कापला होता. मांजामुळे पायाचे हाड कापलेल्या तरुणीचे नाव मोसमी मोरेश्वर रहांगडाले आहे. ती सक्करदरा येथे राहते व श्री हॉस्पिटलमध्ये सीआरसी या पदावर काम करते. सकाळी मैत्रिणीसोबत हॉस्पिटलमध्ये ती जात होती. दरम्यान, मोसमीच्या पायात नायलॉन मांजा अडकला होता
ही बातमी देखील वाचा...
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील 40 सीबीएसई शाळांकडून एनओसी देण्यास टाळाटाळ!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)