Nashik News : बिल भरण्यासाठी एटीएम दिल अन् सहा लाखांची फसवणूक झाली, नांदगावच्या माजी आमदार पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
Nashik News : नांदगावमध्ये इंटरनेट बँकिंग व्यवहाराद्वारे परस्पर सहा लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik News : आजकाल प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमधून (Mobile) व्यवहार होत असल्याने बँकेत न जाताही व्यवहार करता येतात. मात्र अनेकदा विश्वासाने दिलेला एटीएम पिन आणि बँकिंग (banking) माहितीमुळे अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असतात. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील नागापूर परिसरात घडला आहे. एका बँक खातेदाराच्या खात्यातून इंटरनेट बँकिंग व्यवहाराद्वारे परस्पर सहा लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील नागापूर येथे ही घटना घडली आहे. येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतरबिलाचे पैसे देण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले. मात्र इंटरनेट नसल्याचे कारण सांगून एटीएम कार्ड ठेऊन घेतले. त्यानंतर संबंधिताने सदर एटीएम कार्डमधून सहा लाख रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी राजस्थान येथील रामअवतार सिंह श्रीहरफूल सिंह यांनी पवार यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून माजी आमदार संजय पवार (Sanjay Pawar) आणि त्यांचे पुत्र सूरज पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र सिंह (Rajendra Sinha) यांच्या कंपनीला महाराष्ट्र सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने मनमाड नांदगाव रोड NH 7533 हया रोडचे सिमेंट रोड बनवण्याचे कामकाज मिळाले होते. कंपनीने मनमाड नांदगाव सिमेंट रोडचे काम जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत पूर्ण केले. परंतु रोडचे काम चालू असताना कंपनीच्या वेगवेगळया वाहनांना आणि मशिनरीसाठी लागणारे पेट्रोल व डिझेल हे दोन पिकअपमध्ये टाकी ठेवून त्यामध्ये संजय पवार यांच्या सिद्धिविनायक पेट्रोल पंपावरून भरून प्लॉटवर आल्यानंतर पेट्रोल पंपावर मिळालेली पावती व पेट्रोल-डिझेल चेक करून दुस-या टाकीत जमा केले जात होते व गरजेनुसार वाहनांना पुरवले जात होते.
माजी आमदार पिता पुत्रांवर गुन्हा
दरम्यान संजय पवार यांच्या सिद्धिविनायक पेट्रोल पंपावरून घेतलेल्या डिझेलचे बिल कार्ड व्दारे दिले जात होते. पंपाचे डिझेल व पेट्रोल भरल्याचे बाकी राहीलेले 30 हजार रुपये देण्यासाठी सदर कंपनीचे अकाऊंटंट मॅनेजर मनोज कुमार पारीख यांनी कार्ड हे त्यांच्याच कंपनीचे डिझेल इन्चार्ज राकेश कुमार यांना दिले. राकेश कुमार यांनी पैसे देण्यासाठी सुरज पवार याच्या हातात कार्ड दिले. परंतू सुरज पवार यांनी इंटरनेट प्रॉब्लेम आहे, असे कारण सांगून ट्रांजेक्शन होत नसल्यामूळे कार्ड माझ्याकडे ठेवून जा, इंटरनेटची रेंज आल्यावर ट्रांजेक्शन करून कार्ड सकाळी तूम्हाला देतो असे राकेश कुमार यांना सांगून परत पाठवले. यादरम्यान पवार यांच्याकडे ठेवून घेतलेले कार्ड स्वॅप मारून त्यातून सहा लाख रुपये काढून घेत फसवणूक केली.