एक्स्प्लोर

संगतीचा परिणाम ते शेतकऱ्यांची खिल्ली उडवणार वक्तव्य, रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा, म्हणाले, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका

शेतकरी (Farmers) वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे? असा रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar : शेतकरी (Farmers) वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

शेतकरी वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. केंद्र सरकार सोयाबीन आयात करत आहे, कापसावरील आयात शुल्क हटवले आहे, कांद्याची निर्यात बंदी केली आहे, कोणत्याच पिकाला भाव नाही, त्यात नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान लाखोंचे पण तुम्ही हातावर टेकवले अवघे 8000? अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा कर्ज कसे फेडायचे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. 

संगतीचा हा परिणाम असला तरी आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती

निवडणुका होत्या म्हणून आश्वासन दिले, शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावावी, वेळच्या वेळी कर्ज फेडावे यासंदर्भात आपण केलेलं वक्तव्य अत्यंत निंदाजनक असून शेतकऱ्यांची खिल्ली उडवणार आहे. संगतीचा हा परिणाम असला तरी आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. 

मुळात या सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलीही आस्था नाही

मुळात या सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलीही आस्था नाही, शेतकऱ्यांना दिलासा देता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. आता मीठ चोळलं तर  दिलगिरी व्यक्त कराल, ही अपेक्षा असे रोहित पवार म्हणाले. महत्वाचं म्हणजे हे सगळं बघितलं तर काल सरकारने दिलेलं आश्वासन म्हणजे बुडणाऱ्या बँकेचा कधीही न वटणारा post dated चेक आहे , असंच म्हणावं लागेल असे रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांनी केलेल्या वक्त्व्यावर रोहित पवार यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget