एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rohit Pawar on Baramati Loksabha : बारामतीकर भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत; रोहित पवारांचा हल्लाबोल

रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करून बारामतीकर भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून पत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. 

Rohit Pawar on Baramati Loksabha : बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksabha) औपचारिकपणे सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव निश्चित झाल्यानंतर बारामतीमध्ये आता अधिकृतपणे राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभेवरून अजित पवार गट आणि शरद पवार गटांमध्ये घणाघाती प्रहार सुरू आहेत. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तसेच भावनिक आवाहन सुद्धा केलं जात आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर आता थेट लढाईला सुरुवात झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करून बारामतीकर भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून पत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. 

पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटला आहे की बारामतीतून सुप्रियाताई लढणार हे आधीच निश्चित होतं, त्यामुळं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं. दुर्दैवाने आज भाजपची चाल यशस्वी ठरली असली तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी टपून बसलेल्या भाजपच्या या खेळीला बळी न पडता बारामतीकर सुप्रियाताईंना ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे.

दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उमेदवार निश्चित केल्यानंतर आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष टोकाला गेला आहे. अजित पवार सातत्याने मला कुटुंबातून एकटं पाडलं जात आहे, असा हा प्रचार करत भावनिक आवाहन करताना दिसून येत आहेत. या टिकेला शरद पवार गटाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 

बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार कुटुंब समोर आल्यानंतर अजित पवारांच्या विरोधात त्यांचा सख्खा भाऊ सुद्धा गेला आहे. श्रीनिवास पवार यांचे कुटुंब पूर्णतः सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभा राहिलं असून त्यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे या आता लढाईमध्ये कोण बाजी मारणार? याचे उत्तर आता चार जून रोजी मिळणार आहे. बारामती लोकसभेला सात मे रोजी मतदान होणार असून प्रचाराला आता अधिकृतपणे वेग आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळालाkonkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, सरकरार स्थापन होण्यापूर्वीच मागणीSanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Embed widget