(Source: ECI | ABP NEWS)
Rohit Pawar: मग आज संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक अपवाद का? नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातलं जातंय? रोहित पवारांची विचारणा
Rohit Pawar: कायमच नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातले जातंय? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे.

Rohit Pawar: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाठ यांच्यावर विविध कारणांवरून गंभीर आरोप होत आहेत. संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला मिळालेल्या दीडशे कोटींच्या जमिनीमुळे सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संदिपान भुमरे, संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या
रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर सडकून टीका केली आहे. कायमच नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातले जातंय? या सर्वांना तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये दुधाने अंघोळ करून पवित्र संत महात्मा केलं आहे का? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे. तुमच्या नैतिकतेची हीच खरी परीक्षा असून या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करून केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राज्यात बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांच्यापासून तर आर. आर. पाटील (आबा) यांच्यापर्यंत अनेक नेत्यांभोवती वेगवेगळ्या वादाचं मोहोळ निर्माण निर्माण झालं होतं. त्यामध्ये आता सरकारमध्ये असलेल्या खुद्द अजितदादांचाही समावेश असून या सर्वांनीच त्या-त्या वेळी मंत्रिपदाचा त्याग केला. शिवाय ज्या ज्या वेळी भाजप विरोधात होती त्या प्रत्येक वेळी त्यांनीही राजीनाम्यासाठी आकांडतांडव केलंच होतं.. मग आज संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक हेच अपवाद का? कायमच नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातलं जातंय? की या सर्वांना तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये दुधाने आंघोळ करुन पवित्र संत-महात्मा केलं? तुमच्या नैतिकतेची हीच खरी परिक्षा असून या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!
आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली
दरम्यान, रॅपिडोवरूनही आमदार रोहित पवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर मंत्रीपदाच्या गैरवापराचा आरोप केला होता. त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, रॅपिडो बाईक आली, त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली. बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली. मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली. यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट होतं! पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना?
इतर महत्वाच्या बातम्या

























