ऑक्सिजनसाठी रुग्णांना वापरण्यात येणाऱ्या मास्कचा पुर्नवापर; सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील प्रकार
9 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकरिता वापरण्यात येणारे मास्क कचऱ्याच्या डब्यात टाकून ते पुन्हा वापरत आणलं जात आहे. त्याचा व्हिडीओ रुग्णाच्या नातेवाईकाने बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून व्हिडीओमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजनसाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या परत धुवून वापरल्या जात आहेत, असा व्हिडिओ एका पेशंटच्या नातेवाईकांनी शेअर केला आहे. तसेच त्याने मुख्यालयातील सर्व डॉक्टरांना हा व्हिडीओ दाखवला आहे आणि यासंदर्भात तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतःही केल्याचं व्हिडीओत सांगितलं आहे. प्रत्यक्षात हा व्हिडीओ सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील आहे. मात्र ज्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारची योग्य माहिती न घेता बनवला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

9 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकरिता वापरण्यात येणारे मास्क कचऱ्याच्या डब्यात टाकून ते पुन्हा वापरत आणलं जात आहे. त्याचा व्हिडीओ रुग्णाच्या नातेवाईकाने बनवला होता. ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर यांच्या वापराकरीता वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मास्कची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी केली जाते. ते केवळ एकाच वेळी किंवा पुर्नवापरात येत असतील तर त्यांचा शास्त्रीय पद्धतीने वापर केला जातो. आतापर्यंत केव्हाही अशा पद्धतीने बायो मेडिकल वेस्टच्या नियमांचे उल्लंघन झालेले नाही. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स याकरिता प्रशिक्षित आहेत. ज्यांनी हा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. त्यांनी योग्य प्रकारे माहिती न घेता व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं आहे असं वाटतं. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत अहवाल मागितला असून त्यांनाही अहवाल सादर करण्यात आला आहे, असं प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितलं.
ऑक्सिजन सप्लाय किंवा डोस देण्या करता वापरात येणारे ऑक्सिजन मास्क हे कचऱ्यात टाकून दिल्यानंतर त्यांचा पुन्हा वापर करण्यात येत असल्याचा व्हिडीओ जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रूग्णाने काढूण तो सगळीकडे सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. रूग्णालय प्रशासनाच्या या बेजबाबदारपणावर सर्वत्र टीका करण्यात येत होती. जिल्हा रूग्णालय रूग्णाच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप देखील या निमित्ताने करण्यात येत होता. मात्र आता जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी हा व्हिडीओ अपुऱ्या माहीतीच्या आधारे एका रूग्णाने बनवला असल्याचं सांगितलं आहे. बायोमेडीकल वेस्ट म्हणजेचं त्याची हाताळणी आणि व्यवस्थापन या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेलं नसल्याचं डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितल आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























