Pravin Chavan : मी गिरीश महाजनांच्या केससंर्भात राजीनामा दिला; प्रविण चव्हाण यांचे स्पष्टीकरण
आपण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या केससंदर्भात राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांनी दिले आहे.
Pravin Chavan : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. परंतु, "आपण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या केससंदर्भात राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण प्रविण चव्हाण यांनी दिले आहे.
"कृष्णा पवार हा माझा अजून एक असिस्टंट आहे. त्याच्या अकाउंटला तेजस मोरे याने स्वतःहून पैसे पाठवले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील एका पीएसआयला देण्यासाठी हे पैसे पाठवण्यात आले होते. तेजस मोरे याची एखादी केस पिंपरी-चिंचवड येथे असेल. तेजस मोरे याने प्रथम माझ्या कार्यालयात एसी बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी एसी नको म्हणून सांगितले. त्यांनंतर स्मार्ट टीव्ही बसवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रविण चव्हाण यांनी केला आहे.
"तेजस मोरे याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे मी तपासासाठी देणार आहे. या प्रकरणातून बाजूला होणे योग्य वाटल्यामुळे मी राजीनामा दिला आहे, असे सांगत मी कोणालाही भेटलो नाही. शिवाय माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, असे स्पष्टीकरण प्रवीण चव्हाण यांनी दिले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राइव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Tejas More On Pravin Chavan : प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात मी घड्याळ बसवले नाही ; तेजस मोरे यांचे स्पष्टीकरण
- Tejas More : 'ते' व्हिडीओ बनवत सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना अडचणीत आणणारा तेजस मोरे कोण?
- Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण
- Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर