एक्स्प्लोर

मोठी बातमी! प्रलंबित मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार

Resident Doctor Strike : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपात सहभागी होणार असून, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर : आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची (Strike) हाक देण्यात आली आहे.अनेकदा पाठपुरवठा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतेही कार्यवाही करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपात सहभागी होणार असून, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे. 

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “ गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरवठा केला. पण प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर हे प्रशासनाकडून दाखवण्यात आले. प्रत्यक्षात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विविध प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील सर्व निवासी डॉक्टर हे संपाची भूमिका घेतील. संपामुळे होणाऱ्या रुग्णसेवेवरील परिणामासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आणि संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येतील," असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

संपावर जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही...

यावेळी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "निवासी डॉक्टरांना दिले जाणारे त्यांचे हक्काचे विद्यावेतन हे त्यांना कधीही वेळेवर देण्यात आलेले नाही. अनेक महिन्यांसाठी विद्यावेतन थकीत असल्यामुळे, निवासी डॉक्टरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल्स उपलब्ध नाही. त्यामुळे दोन-तीन डॉक्टरांना एकच खोलीत अत्यंत अडचणीत राहावे लागत आहे. आम्ही आमच्या मागण्या वेळोवेळी प्रशासना पुढे मांडल्या असून, प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त तोंडी आश्वासनाचे गाजर दाखवण्यात आले. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे आमच्यापुढे संपावर जाण्याखेरीज दुसरा पर्याय दिसून येत नसल्याचे" निवेदनात म्हटले आहे. 

निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या...

  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
  • निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

भर कार्यक्रमात वरिष्ठ न्यायमूर्तींना हात धरून उठवलं, चूक लक्षात येताच वृत्तपत्रातून 'माफीनामा'

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 
चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा! आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद, नेमका काय योगायोग? 
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
Embed widget