एक्स्प्लोर

तळकोकणात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना; 7 आणि 8 सप्टेंबरला जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

तळकोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शोध आणि बचावाचं साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी, असे निर्देश प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी आणि त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन संबंधितांकडून करून घ्यावे, असे निर्देश प्रशासनाच्या वतीनं दिले आहेत.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शोध आणि बचावाचं साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. सर्व विभाग, कार्यालय प्रमुखांनी आपापल्या मुख्यालयात हजर रहावं. कोणीही मुख्यालय सोडू नये. आपल्या अधिनस्थ यंत्रणेला देखील तसे आदेश देण्यात यावेत. बांधकाम विभागानं रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित बाजुला करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची वाहतूक करणारे मार्ग अखंडितपणे सुरु राहतील यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावं. बंदर विभागानं अतिवृष्टीच्या कालावधीतील भरती–ओहोटीच्या तारखा जिल्हा आणि तालुका प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी व डीसीएचच्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक्षक अभियंता, महावितरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच या ठिकाणी अखंडित विद्युत पुरवठा सुरु राहील यासाठी नियोजन करावं. तसेच कोविड केंद्रांसाठी जनरेटर उपलब्ध करून ठेवावेत. महसूल आणि पोलीस विभाग यांनी आपल्या ताब्यातील बोटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. अतिवृष्टीच्या अनुषंगानं सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला – 02362-228847 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत देवगड तालुक्यात सर्वाधिक 75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.3 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3354.9825 मि.मी. पाऊस झाला आहे. 
 
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 391.5970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 87.53 टक्के भरलं आहे. गेल्या चोवीस तासांत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 94.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर आणि धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.700 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.300 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Embed widget