एक्स्प्लोर
रिपब्लिकन पक्षच स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ शकतात : श्रीहरी अणे
“खरंच जर भाजपला वेगळे राज्य द्यायचे असेल, तर विदर्भाचा प्रस्ताव याच बजेट सेशनमध्ये आणावं लागेल. नाहीतर ते शक्य नाही.”, असेही श्रीहरणी अणे म्हणाले.
नागपूर : काँग्रेस आणि भाजप दोघेही वेगळे विदर्भ राज्य देऊ शकत नाहीत. जर वेगळा विदर्भ कुणी देऊ शकतं, तर ते म्हणजे रिपब्लिकन पक्ष, असे वक्तव्य विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी केले आहे.
श्रीहरी अणे हे ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाच्या पहिल्या वर्धापन दिनी बोलत होते. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. ‘विदर्भ मिरर’ हे साप्ताहिक खास श्रीहरी अणे यांच्या प्रेरणेतून वेगळ्या राज्याच्या लढ्याला मदत म्हणून सुरु करण्यात आले आहे.
“खरंच जर भाजपला वेगळे राज्य द्यायचे असेल, तर विदर्भाचा प्रस्ताव याच बजेट सेशनमध्ये आणावं लागेल. नाहीतर ते शक्य नाही.”, असेही श्रीहरी अणे म्हणाले.
या वर्धापन दिनी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेस आणि भाजप दोघेही वेगळे राज्य देणार नाहीत. कारण शेवटी विदर्भ ही त्यांच्यासाठी दुभती गाय आहे.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement