एक्स्प्लोर

Republic Day : प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ असणार? 18 राज्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचाही समावेश

Republic Day : दिल्लीमधील चित्ररथाच्या पथसंचलनाच्या सोमवारी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day 2023) परेडमध्ये दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) हा परेडमध्ये एक प्रकारची महाराष्ट्राची शान, अस्मिता म्हणून ओळखला जातो. याच दिल्लीमधल्या चित्ररथाच्या पथसंचलनामध्ये आता महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील परेडमध्ये चित्ररथ असणार का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता 18 राज्यांच्या बैठकीत महाराष्ट्रालाही आमंत्रण देण्यात आलं आहे.

दिल्लीमधील चित्ररथाच्या पथसंचलनाच्या सोमवारी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आलं आहे. एकूण 18 राज्यांना बैठकीसाठी आमंत्रण आहे. मागच्या बैठकीत महाराष्ट्राला आमंत्रण नव्हतं. मात्र, यावेळेस महराष्ट्राला आमंत्रण असल्या कारणाने  त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ या वेळेला राजपथावर दिसणार का याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

साडेतीन शक्तीपिठांच्या देखाव्याचा चित्ररथ 

महाराष्ट्राच्या चित्ररथात यावेळी महाराष्ट्राची एकूण सांस्कृतिक वैभव असलेली साडेतीन शक्तीपिठं आहेत. या शक्तीपिठांत महिला शक्तीचासुद्दा सहभाग आहे. या साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ यावेळी महाराष्ट्राला सादर करायचा आहे. 

गेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला आमंत्रण नाकारल्यानंतर सोमवारी होणाऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आलं आहे. एकूण 18 राज्यांना बैठकीसाठी आमंत्रण आहे त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ या वेळेला राजपथावर दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 18 राज्यांची बैठक झाल्यानंतर राज्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मात्र, यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथाचा समावेश होण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. सोमवारी बैठक झाल्यानंतर त्याच्या पुढच्या दोन दिवसांमध्ये अंतिम यादी निश्चित होईल. 

आतापर्यंतचा चित्ररथाचा इतिहास 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता. तसेच पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच त्यानंतर 2018मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षीचा चित्ररथ जैवविविधता या विषयावर आधारित होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Republic Day : यंदा प्रजासत्ताकदिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार, अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण, महाराष्ट्राचा समावेश नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget