Republic Day : यंदा प्रजासत्ताकदिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार, अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण, महाराष्ट्राचा समावेश नाही
Republic Day : प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात 2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये नव्हता. त्यानंतर दोन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे
![Republic Day : यंदा प्रजासत्ताकदिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार, अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण, महाराष्ट्राचा समावेश नाही Republic Day Maharashtra will not have Chitrarath for Republic Day parade this year Maharashtra not included Republic Day : यंदा प्रजासत्ताकदिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार, अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण, महाराष्ट्राचा समावेश नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/21/6ac7eed460b718c675f21c6d7174e8ba167158640170989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day 2023) परेडमध्ये दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय पण त्यात महाराष्ट्राचा (Maharashtra) समावेश नाही.
राज्यांची संख्या अधिक असल्यामुळे दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. पण रोटेशन पद्धतीने निवड होत असल्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी संधी नसणार आहे. यापूर्वी 2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये नव्हता. त्यानंतर दोन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरचं हे संचलन ठराविक वेळेतच पूर्ण व्हावं लागतं, त्यामुळे दरवर्षी ठराविक राज्यांनाच यात संधी मिळते.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता. तसेच पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच त्यानंतर 2018मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षीचा चित्ररथ जैवविविधता या विषयावर आधारित होता. 2020 साली चित्ररथावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)