एक्स्प्लोर

हापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, रत्नागिरीतून 5 हजार पेट्या रवाना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हापूसबाबत दिलासादायक बातमी आली आहे. 'आत्मा'तर्फे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हापूससाठी थेट शेतकरी ते ग्राहक अशी साखळी योजना केली आहे.राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारात हापूसच्या पेट्या दाखल झाल्या आहेत.

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातला हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. पण, त्याला आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण, 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत तब्बल 5 हजार हापूसच्या पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये रवाना झाला आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही साखळी योजना तयार करण्यात आली आहे. प्रति डझन जवळपास 350 रूपये असा दर सध्या हापूसला मिळत आहे.

एलआयसीची विमाधारकांना साथ, प्रिमियम भरण्याच्या मुदतवाढीसह 'या' महत्वाच्या घोषणा

आत्मा अर्थात अग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीनं केलेल्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली आहे. पंढरपूर, फलटण, सातारा, कराड, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणी या पेट्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान, आंबे घेतल्यानंतर पैसे देखील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच तालुक्यांमधून या पेट्या रवाना होताना दिसत आहे. शिवाय, हा आकडा दिवसेंदिवस वाढेल अशी देखील आशा आहे. मोठ्या बागायतदारांचे स्वताचे नेटवर्क असताना छोटे आंबा बागायतदार आणि शेतकरी यांना मात्र अनेक अडचणी येत होत्या. पण, त्यांच्या मदतीला 'आत्मा' विभाग धावून आला आहे. Ratnagiri Mango Loss | लॉकडाऊनमुळे आंबा वाहतूक थांबली, बागायतदार अडचणीत, लॉकडाऊन वाढल्याने आंबे सडण्याचीही भीती लांबलेला पावसाळा, आणि त्यानंतर हमावानाचा लहरीपणा यामुळे आंबा उत्पादक संकटात होता. त्यामध्ये परत कोरोनाची भर पडली. अशी वेळी सगळं काही संपलं असं वाटत असताना आत्मा विभागानं घेतलेल्या पुढाकारामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात देखील काही प्रमाणात का असेना दिलासा मिळताना दिसत आहे.
 आंबा सडण्याची भीती
दुसरीकडे रत्नागिरी आणि देवगडचा हापूस सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. देवगडमधील आंबा व्यावसायिक प्रचंड अडचणीत आलाय. आतापर्यंत फक्त 15 ते 20 टक्के आंबा मार्केटमध्ये दाखल झालाय. तब्बल 80 टक्के आंबा अजूनही बागेत शिल्लक आहे. यावर्षी रत्नागिरी आणि देवगड हापूसला चांगला दर असूनही कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबई मार्केटमध्ये दाखल झालेल्या आंब्याला चांगला भाव होता.  मात्र, मार्चमध्ये लाॅकडाऊनमुळे आंबा बाजारात गेलाच नाही. दरवर्षी अडीचशे ते तीनशे कोटींची देवगड हापूसची उलाढाल होते. रत्नागिरी आणि देवगडमधील सर्व बागायतदार आंबा पाठवायचा कुठे ? या विवंचनेत आंबा बागायतदार आहेत. खरंतर देवगड आंबा हा जगप्रसिद्ध आहे. देश विदेशात याला खूपच मागणी आहे. पण सध्या देशांतर्गत व देशाबाहेरील वाहतूक सध्या बंद आहे. यामुळे परदेशात आंबा जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त झाला असून शासनाने आता नुकसान भरपाई देवून या शेतकरांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget