एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Urban Naxal Case : कारागृह प्रशासनानं वाचण्यासाठी पुस्तक नाकारणं हास्यस्पद : हायकोर्ट

प्रसिद्ध विनोदी लेखक पी.जी. वुडहाऊस यांचे एक विनोदी पुस्तक नवलखा यांच्या कुटुबियांनी त्यांच्यासाठी पाठवलं होतं. मात्र, ते पुस्तक दोनदा सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह प्रशासनानं नाकारल्याचं हायकोर्टाला सांगण्यात आलं

 मुंबई :  शहरी नक्षलवाद प्रकरणी अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना तळोजा कारागृह प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव विनोदी पुस्तक देण्यास नकार दिल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. त्यावर असे कारण देणे निव्वळ हास्यस्पद असल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. प्रसिद्ध विनोदी लेखक पी.जी. वुडहाऊस यांचे एक विनोदी पुस्तक नवलखा यांच्या कुटुबियांनी त्यांच्यासाठी पाठवलं होतं. मात्र, ते पुस्तक दोनदा सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह प्रशासनानं नाकारल्याचं हायकोर्टाला सांगण्यात आलं. 

वुडहाऊस हे पु. ल. देशपांडेचें प्रेरणास्थान 

त्यावर हे खरे आहे का? अशी विचारणा खंडपीठाने तपास यंत्रणेकडे केली. तेव्हा वुडहाऊस यांचे पुस्तक सुरक्षेसाठी धोका असे मानले जाऊ शकते? हे खरोखरच हास्यास्पद आहे. मराठीतील प्रसिद्ध विनोदी लेखक पु.ल देशपांडेंसाठी वुडहाऊस हे प्रेरणास्थान होते, असे न्यायमूर्ती शुक्रे यांनी स्पष्ट केलं. यावरून तुरुंग अधिकाऱ्यांची वृत्ती दिसून येते. कारागृह अधिकारी कारागृह नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत असतीलही पण अटकेत असलेल्या व्यक्तीच्या कारागृहातील राहणीमानावर लक्ष ठेवणं, त्याच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होतायत की नाही हे पाहणं एनआयएचं काम आहे अशी टिप्पणीही हायकोर्टानं केली.

भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून नवलखा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. नवलखांचे वाढते वय आणि आजारांमुळे आता त्यांना घरात नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. सोमवारी न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी तळोजा कारागृहातील सद्यस्थितीबाबतची माहिती खंडपीठाला देण्यात आली. नवलखा यांना कारागृहात मूलभूत आणि माफक सोवीसुविधाही पुरविल्या जात नाहीत. त्यांना असह्य वेदना होत असूनही बसण्यासाठी खुर्ची दिली जात नाही. त्यांचा चष्मा चोरीला गेल्यानंतर नवीन चष्मा त्यांना पाठवण्यात आला मात्र अजूनही त्यांना तो देण्यात आलेला नाही. नवलखा यांना वाचनासाठी पुस्तकंही दिली जात नाहीत. त्यातच नवलखा हे आता सत्तरीत असून त्यांना कारागृहात ठेवल्यास काहीही फायदा होणार नाही. या खटल्यात अद्याप आरोप निश्चित व्हायचे आहेत. खटला सुरू झाला तरी तो पूर्ण व्हायला अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत नवलखांना मुलभूत सुविधांशिवाय कारागृहात ठेवण योग्य आहे का?, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.

या याचिकेत कारागृह अधिकारी आणि कारागृहातील खराब स्थितीवरही आरोप करण्यात आले आहेत. सद्यपरिस्थिती पाहता नवलखा यांची नजरकैदेची मागणी योग्य ठरते पण तरीही राज्य सरकार त्याची दखल घेत नाही. सरकारकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तळोजा कारागृहातील क्वारंटाईन वॉर्डच्या खराब स्थितीबाबत नवलखा यांनी केलेल्या आरोपांची दखल घेतली नसल्याची हायकोर्टानं नोंद घेतली. तसेच याचिकाकर्त्यांचे वकील युक्तिवाद करत असताना न्यायालयात सरकारी वकीलांच्या गैरहजेरीवरही हायकोर्टानं नाराजी व्यक्त करत संबंधित सरकारी वकिलांना लेखी माफीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget