एक्स्प्लोर

आर्सेनिकम अल्बम 30 बाबत रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा निर्णय; हा निर्णय घेणारा राज्यातील पहिला जिल्हा!

कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर आर्सेनिकम अल्बम 30 बाबत रत्नागिरी जिल्ह्याने मोठा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत देखील आता वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. दरम्यान, कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता रत्नागिरी जिल्ह्याने मोठा निर्णय घेतला आहे.

होमिओपॅथी आर्सेनिकम अल्बम 30 (Arsenicum album 30) जिल्ह्यातील साडेचार लाख घरामध्ये मोफत वाटणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. असे वाटप करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय. आशा वर्करमार्फत गोळ्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. केवळ रत्नागिरीच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अशा प्रकारचा निर्णय घेत गोळ्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गोळ्यांचा खर्च हा कोविड फंडातून केला जाणार आहे.

Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?

जिल्हा आयुष विभागाचे म्हणणे काय? रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आर्सेनिकम अल्बम 30 (Arsenicum album 30) या गोळ्या उपयुक्त आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती नक्की वाढेल. याचा फायदा कोरोनाच्या या लढ्यात होणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. शिवाय, कुणावर इतर कोणत्या रोगाचा इलाज सुरू असल्यास देखील या गोळ्या घेता येणार आहेत. रोज उपाशी पोटी तीन गोळ्या केवळ तीन दिवस घ्यावी लागतील. त्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा या गोळ्या तीन दिवस घ्यायच्या आहेत. असे तीन महिने प्रत्येक व्यक्तिला या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. लहान वयोगटातील मुलांना देखील या गोळ्या दिल्यास कोणताही धोका नाही, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा आयुष विभागाचे प्रमुख आशफाक हाजी यांनी दिली आहे.

केव्हा होणार वाटप सुरू? या गोळ्यांकरता कोविड फंडमधून खर्च केला जाणार आहे. त्याकरता जिल्हाधिकारी लवकरच हा खर्च मंजूर करतील. पुढील 2 ते 4 दिवसात याची सुरूवात होईल आणि जिल्ह्यातील प्रत्येक घरात या गोळ्या मोफत वाटल्या जातील, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Lockdown 4.0 Guidelines | लॉकडाऊन 4 मध्ये मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंद, संध्या.7 ते सकाळी 7 कर्फ्यू

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget