Rashmi Shukla : संजय राऊत यांचे फोन रश्मी शुक्ला स्वत: ऐकायच्या, 'साहेब' असा उल्लेख झाल्यास विशेष लक्ष
Phone Tapping Case : खासदार संजय राऊत साहेब असं कुणाचा उल्लेख करायचे यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते असा जबाब पोलीस अंमलदाराने दिला आहे.
मुंबई: रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन स्वत: रश्मी शुक्ला ऐकत होत्या, संजय राऊत फोनवरून साहेब म्हणून कुणाचा उल्लेख करायचे यावर लक्ष ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याचं अमंलदाराने जबाब दिला आहे. 2019 साली खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर असून या प्रकरणी तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 700 पानी अहवाल दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 18 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या 18 जणांमध्ये एका अंमलदाराचा समावेश असून तो अंमलदार 2019 मध्ये राज्य गुप्तचर विभागात कार्यरत होता. या अंमलदाराने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, संजय राऊत साहेब म्हणून कोणाशी बोलायचं यावर खास लक्ष देण्याचा आदेश होता. याचा रिपोर्ट हा वरिष्ठांना द्यावा लागायचा. फोन टॅपिंग करणाऱ्या या टीममध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांसह 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे फोन टॅपिंग प्रकरण वैध्य आहे की अवैध्य हे माहित नसल्याचं या अंमलदाराने सांगितलं आहे.
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 700 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्या विरोधात हे चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये 20 शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुल्का यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या. रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- रश्मी शुक्लांविरोधात मुंबई पोलिसांकडून 700 पानी चार्जशीट दाखल, संजय राऊतांचा जबाब नोंद
- Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी बोगस नावं वापरल्याचा खुलासा; संजय राऊतांसाठी एस. रहाटे, तर खडसेंसाठी...
- Phone Tapping Case : 'समाजविघातक घटक' म्हणून फोन टॅप झाल्याच्या वृत्तानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले...