एक्स्प्लोर

शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याचा इशाऱ्यानंतर दानवे म्हणतात...

नागपूर : शिवसेनेचे मंत्री 18 फेब्रुवारीच्या प्रचारसभेत राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरकारला पाच वर्ष धोका नसल्याचं म्हटलं आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, "भाजपचं सरकार पाच वर्ष चालेल. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. शिवसेनेची आणि आमची महापालिका तसंच जिल्हा परिषदेत युती नाही. परंतु सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत आणि सरकारचा पाठिंबा त्यांनी काढलेला नाही." शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरतात या प्रश्नावर उत्तर देताना रावसाहेब दानवेंनी सेनेला टोला लगावला. "ते ज्या दिवसापासून सरकारमध्ये आले, त्या दिवसापासून राजीनामे घेऊन फिरत आहेत," असं दानवे म्हणाले. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास 150 आमदार भाजपच्याविरोधात : अजित पवार मुंबईत खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मुंबईत आमची खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आहे. आम्ही त्यांना शत्रू मानतो,  भाजप इतर कोणालाही शत्रू मानत नाही. जो सोबत येईल त्याच्यासह, जो येणार नाही त्याच्याशिवाय निवडणूक जिंकू. शिवसेना आमचा सरकारमधील साथीदार आहे, पण वेगळा पक्ष आहे. शिवसेना साथीदार आहे, मात्र निवडणुकीत मध्ये आम्ही वेगवेगळे आहोत." शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली? दरम्यान, खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारीच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी आणि मतदारांमध्ये संदेश देण्यासाठी शिवसेना ही खेळी करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली? शिवसेनेने पाठिंबा काढल्यास 150 आमदार भाजपच्या विरोधात : अजित पवार दुसरीकडे महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर विरोधी आमदारांची संख्या 150 च्या घरात पोहोचेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला आहे. ते बारामतीच्या कन्हेरीत प्रचारसभेत बोलत होते. भाजपच्या डोक्यात सत्ता भिनल्याने त्यांचे सर्वच मित्रपक्ष नाराज आहेत. सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना काहीच अधिकार नसल्याने महापालिका निवडणुकीनंतर सरकार राहिल की नाही याबाबत संभ्रम असल्याचं अजित पवार म्हणाले. संबंधित बातम्या राजीनामे खिशात नाहीत, पण आदेश येताच मंत्रिपद सोडू : शिवतारे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द “राजीनामा खिशात, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा” शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सेना मंत्र्यांची फौज ‘वर्षा’ बंगल्यावर

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget