एक्स्प्लोर
राज्यात युतीचं सरकार 5 वर्ष टिकणार: रावसाहेब दानवे
मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी युती तुटल्याचं खापर शिवसेनेच्या डोक्यावर फोडलं आहे. 'युती व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र शिवसेनेनं काडीमोड घेतला.' असं दानवे म्हणाले.. दरम्यान, 'राज्यात सत्तेवर असलेलं युतीचं सरकार 5 वर्षे पूर्ण करेल.' असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी बोलून दाखवला.
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात युती होणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर राज्यातील आणि केंद्रातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार का? असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे. त्यालाचा उत्तर देताना दानवे म्हणाले की, 'राज्यात सत्तेत असलेलं युतीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल.'
दरम्यान, विरोधी पक्षानं मात्र, शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेना सत्तेला चिकटून बसली आहे. अशी सुनील तटकरेंनी टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-भाजपवर खोचक टीका केली. 'युती तुटल्याचं मला अतीव दु:ख आहे' असं पवार म्हणाले. तसेच 'काय तो निर्णय घ्यावा आणि मग चर्चेला यावं' असं म्हणत पवारांनी भाजपलाही चुचकारलं.
‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी घोषणा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भाजपची युती तुटल्याची घोषणा केली.
संबंधित बातम्या:
एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल?
शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार
‘युती तुटल्याचं अतीव दुःख झालं’, शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया
शिवसेनेचे सर्व मंत्री बॅगा भरुन तयार आहेत: सुभाष देसाई
जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement