रावसाहेब दानवे-राज ठाकरे भेटीनंतर चर्चांना उधाण; दानवेंनी सांगितलं भेटीचं खरं कारण, म्हणाले..
Raj Thackeray and Raosaheb Danave Meet : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीची राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
Raj Thackeray and Raosaheb Danave Meet : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आणि या भेटीची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं या भेटीबाबतच्या कारणावर रावसाहेब दानवे यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी सांगितलं की, झोपडपट्टी हटाव आणि पुर्नवसन या मुद्द्यांवर त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.
दानवे यांनी सांगितलं की, 'मुंबई सारख्या महानगरांमध्ये रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झोपडपट्टीधारकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी हटवू नये अशी अनेकांची इच्छा आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी दानवेंकडे मागणी केली. ज्याप्रमाणे नुकतच ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच काम करण्यात आलं. त्याप्रमाणे विकास करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. मात्र पुर्नविकासाची जबाबदारी राज्य सरकारची असेल.'
रावसाहेब दानवे आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली : पाहा व्हिडीओ
त्यांनी पुढे सांगितले की, 'यासंदर्भात आम्ही दिल्लीमध्ये बैठक केली आणि त्यानंतर मुंबईला मी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सर्वपक्षीय बैठक घेतली. या विषयावर राज ठाकरे यांनीही चर्चा करण्यात रस दाखवला होता. त्यानंतर शनिवारी वेळ जुळून आल्यानंतर राज ठाकरेंसोबत या विषयावर चर्चा झाली.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- जयंत पाटलांचा 112 आपत्कालीन नंबरला फोन! 15 मिनिटात मिळाली पोलिसांची मदत
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1054 नवे रुग्ण, 29 जणांचा मृत्यू
- MPPEB Recruitment 2022 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3 हजाराहून अधिक पदांसाठी बंपर भरती; लवकर अर्ज करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha