उद्धव ठाकरेनं खेडच्या सभेला अख्या राज्यातून माणसं आणली, अफजल खान चालून येतो तसा आला : रामदास कदम
योगेश कदमला राजकारणात उठवण्याचा उद्धव ठाकरे यांनी विडा उचलला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदाराला गाडून योगेश कदम आमदार झाले, असे रामदास कदम म्हणाले.
दापोली : हिंमत असेल, तर दापोलीत सभा लाव आणि किती माणसं जमतात ते दाखवा, भाड्याने माणसं आणू नकोस. खेडच्या सभेला उभ्या महाराष्ट्रातून माणसं आणली, जसं अफजल खान चालून येतोय, तसा उद्धव ठाकरे चालून आला, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपल्या चमचे पाठवून इकडचं व्हिडिओ बघावेत, म्हणजे योगेश कदम याची ताकद कळेल. योगेश कदमला राजकारणात उठवण्याचा उद्धव ठाकरे यांनी विडा उचलला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदाराला गाडून योगेश कदम आमदार झाले.
पहिला गद्दार उद्धव ठाकरे
आपल्या आमदाराला पाडण्यासाठी प्रयत्न करणारा पहिला गद्दार उद्धव ठाकरे असल्याची टीका रामदास कदम यांनी केली. दरम्यान, भाजपने केसाने गळा कापू नये, अशी टीका केली होती. यानंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर आल्यानंतर रामदास कदम म्हणाले की, मी वरिष्ठ भाजपबद्दल बोललो नाही, पण इथले भाजप नेते आम्हाला संपवत आहेत. यावेळी बोलताना कदम यांनी रवींद्र चव्हाण यांचा एकेरी उल्लेख केला. एकनाथ शिंदेच फक्त उद्धव ठाकरे यांना धडा शिकवू शकतात, असेही ते म्हणाले. आदित्य यांचा पिल्लू असा उल्लेख कदम यांनी केली.
हे सर्वसामान्य सरकार, अन्यायाविरोधात लढणारे रामदास कदम
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, योगेश कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं. हे सर्वसामान्य सरकार, अन्यायाविरोधात लढणारे रामदास कदम आहेत. घरी बसून उंटावरून शेळ्या आखणारा हा एकनाथ शिंदे नाही, लोकं जनसंवाद यात्रा काढतात, पण जनसामान्यांची संवाद ठेवला असता तर याची गरज नव्हती, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली असून एक चेहरे पे अनेक चेहरे लगा लेते है लोग, माझ्या सहकाऱ्यांना मी मुख्यमंत्री समजतो. महायुतीचा धर्म शिवसेना पाळेल असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, रामदास कदम यांनी ज्या व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या ती वस्तुस्थिती आहे. शिवसेना आमदार खासदारांचा खच्चीकरण होऊ लागलं, त्यामुळे महाराष्ट्र जनतेला पाहिजे होतं ते आम्ही केले. 50 कॅबिनेटमध्ये 500 निर्णय आपण घेतले, मोदींसाठी राज्यातून 45 पार आपण झालो पाहिजे. या सरकारचं काम बघून काही लोकांना मिरच्या झोंबतात, आजही मी कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता असणार असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या