(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raksha Bandhan LIVE Updates: रक्षाबंधन, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण; पाहा लाईव्ह अपडेट्स
Raksha Bandhan 2021 LIVE Updates: श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
LIVE
Background
Rakshabandhan 2021 : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचं प्लानिंग करायला सुरुवात झाली आहे. परंतु, आजच्या रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट आहे.
रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 21 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु होणार आहे. तर 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येत आहे.
रक्षाबंधन हा हिंदू सण आहे. जो भारताच्या विविध भागात साजरा केला जातो. मॉरिशस आणि नेपाळमध्ये देखील हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून रक्षाबंधन सण साजरा केला जात असून हा मुख्य हिंदू उत्सवांपैकी एक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्याची कामना करते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी रक्षाबंधन
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरीदेखील आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या तिन्ही बहिणींनी राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधून भावा बहिणीचे नाते घट्ट करत औक्षण करीत राखी बांधलीय ..पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी राज्यमंत्री भरणे यांना कुसुम धापटे , साळुबाई चौगुले ,हिराबाई वायाळ या तिन्ही बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला आहे...
माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी रक्षाबंधन सोहळा
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रक्षाबंधन, लहान बहीण वर्षा देसाई यांच्याकडून बांधून घेतली राखी
आज रक्षाबंधनाच्या निमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना त्यांच्या धाकट्या भगिनीने राखी बांधत आपल्या मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पाथरवाला या गावी या बहिण भावाची राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वाना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देत पुढील काळात येणारे सण-उत्सव पाहता कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन देखील केले
देहविक्री करणाऱ्या महिलांकडून राखी बांधून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक भाऊ आपल्या लाडक्या बहिणीकडून राखी बांधून तिच्या सुख समाधानाची कामना करत असतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यात युवा चेतना फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलाय. समाजातून उपेक्षित असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांकडून राखी बांधून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केलाय.
पोलीस पत्नीचं मंत्री जितेंद्र आव्हांडांसोबत रक्षाबंधन, रक्षाबंधनाच्या आधीच दिलं हक्काच्या घराचं गिफ्ट
वरळी बीडीडी चाळीतील पोलिसांना हक्काच्या घराचं गिफ्ट दिल्यानंतर पोलीस पत्नी यांच्या विनंतीला मान देत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड रक्षाबंधनासाठी वरळी पोलीस वसाहतीत येत आहेत. यंदाचा रक्षाबंधन सोहळा पोलीस परिवारासाठी भावनिक क्षण आहे. एक मंत्री नाही तर हक्काचा भाऊ म्हणून जितेंद्र आव्हाड पोलीस पत्नींच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे सर्व पोलीस पत्नी जितेद्र आव्हाड यांना राखी बांधणार आहेत.