कर्ज तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांवर, पण महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतात? राकेश टिकैत म्हणाले...
संयुक्त मोर्चाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी व्यक्त केले. ते वर्ध्यात (Wardha) पत्रकार परिषदेत बोलत होते.
Rakesh Tikait : महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? कर्ज (Loan) तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांवर आहे, मग महाराष्ट्रातच कोणती अशी परिस्थिती आहे की ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे संघटन मजबूत नाही असे वक्तव्य संयुक्त मोर्चाचे प्रमुख शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केले. संयुक्त मोर्चाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे संघटन मजबूत करण्याची गरज असल्याचे राकेश टिकेत यांनी सांगितले. ते वर्ध्यात (Wardha) पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंजाब हरियाणामध्ये कर्ज असले तरीही जमीन आणी ट्रॅक्टरचा लिलाव होऊ शकत नाही
पंजाब हरियाणामध्ये कर्ज असले तरीही जमीन आणी ट्रॅक्टरचा लिलाव होऊ शकत नाही. कारण तिथे शेतकरी संघटना मजबूत आहे. एखाद्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर लिलाव करण्यासाठी आणि जप्त करण्यासाठी कोणी आले तर संपूर्ण शेतकऱ्यांचं संघटन एकत्र येते त्याला विरोध केला जातो. त्यामुळं शेतकऱ्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. शेत पिकाला भाव मिळत नाही. आम्ही मेहनत करतो पण भाव मिळत नाही, याचा अर्थ शेतात पिकत नाही म्हणून भाव मिळत नाही असा नाही तर भाव देणारी सत्ता बेईमान आहे असे राकेश टिकैत म्हणाले. आमच्यासोबत धोकेबाजी कोण करतो आहे. मुंबईत राहणारा व्यापारी जर चढ्या भावात जमीन विकत घेत असेल तर त्यात मोठी गडबड आहे. मोठा स्वार्थ आहे हे शेतकऱ्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचे टिकैत म्हणाले.
लवकरच महाराष्ट्र राज्यात देखील मोठे आंदोलन उभारले जाणार
जमिनी जबरदस्ती बळकावल्या जात आहेत. याला विरोध झाला पाहिजे, यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे असे राकेश टिकैत म्हणाले. लवकरच महाराष्ट्र राज्यात देखील मोठे आंदोलन उभारले जाणार आहे. किसान संयुक्त मोर्चा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यासोबत आहे. शेतकरी बांधवानो आत्महत्या करू नका आंदोलन करा असेच आवाहन किसान संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेत यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. भाजपाला मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनाची गरज आहे. काँग्रेसला मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आंदोलनाची गरज आहे. शेतकरी कुणालाही मतदान करो पण आंदोलनसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संयुक्त किसान मोर्चासोबत उभे राहायला पाहिजे असे राकेश टिकैत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























