Raju Shetti On Kolhapur by-election Results: Raju Shetti : कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य, भोंग्याच्या राजकारणावरुन म्हणाले...
Raju Shetti On Kolhapur by-election Results: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.
Raju Shetti On Kolhapur by-election Results: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, "कोल्हापूर पोटनिवडणुकीत आम्ही कोणतीही भूमिका घेतली नव्हती. स्वाभिमानीनं संघटनेनं सत्तेतील पक्षांपासून दूर राहायचं ठरवलं आहे. त्यामुळे कोणीही जिंकलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. या निवडणुकीत मनी फॅक्टर महत्वाचा ठरला. दोन्ही पक्षांनी याचा वापर केला असा आरोपही राजू शेट्टी म्हणाले आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदारांनी निवडून देत आहे. मात्र, यावरून राज्याची जनता महाविकासआघाडीच्या मागे आहे, असा अंदाज बांधता येणार नाही", असंही त्यांनी म्हटलं आहे.
भोंग्याच्या राजकारणावर राजू शेट्टींचं भाष्य
भोंग्याचं राजकारण हे सर्व पक्षीयांकडून संगनमतानं सुरुये. महागाई वाढलीये, पिकाच्या खतांमध्ये दरवाढ झालीये, विध्यार्थ्यांना परीक्षांना सामोरं जाताना अडचणींचा सामना निर्माण करावं लागतंय, असे विविध प्रश्न निर्माण झालेत. अशात कोणी हनुमान चालीसा म्हणायचं तर कोणी भोंगे लावायची भाषा करतय. यावर काही बोलायची सोयच राहिली नाही.
महाविकास आघाडीतून बाहेरपडण्याबाबत राजू शेट्टी काय म्हणाले?
"मला शेतकऱ्यांनी जेंव्हा बोलावलं तेंव्हा-तेंव्हा मी बारामतीत गेलेलो आहे. अगदी पंधरा दिवसांपूर्वी ही मी बारामतीत जाऊन आलोय. तेंव्हा मी महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. तो आत्ता घेतला आणि त्यानंतर मी इंदापुरला सभा घेतोय. याचा अर्थ मी महाविकासआघाडीच्या सत्तेत होतो म्हणून विशिष्ट भागात जात नव्हतो असं नव्हे. हा चुकीचा अर्थ लाऊ नये", असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल करणार- राजू शेट्टी
वीज दिवसा मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतोय. आमचे होणारे हाल आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत. आम्हाला कोणतंच सरकार दाद देत नसल्यानं शेवटी न्यायालयाचे दार ठोठावत आहोत.
हे देखील वाचा-
- Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव
- Kolhapur North By Election Results : सतेज पाटलांचं बावडा असो, की राजेश क्षीरसागरांचा खोल खंडोबा, जयश्री जाधवांना कुठे किती लीड?
- Jayashree Jadhav : कोल्हापूर जिंकल्यावर चंद्रकांत अण्णांच्या आठवणीत जयश्री जाधव भावूक; म्हणाल्या...