एक्स्प्लोर
Advertisement
विधानसभेसाठी आमची 20 ते 25 जागांची तयारी : राजू शेट्टी
बांगलादेशसाठी लावलेले निर्यात शुल्क माफ करावे. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना या भागात कांदे फेकून मारू, असे ते म्हणाले.
नाशिक : विधानसभेत भाजप शिवसेनेविरोधातच आमची लढाई आहे. विधानसभेसाठी आमची 20 ते 25 जागांची तयारी असून सगळे सोबत आले तर आम्ही विधानसभेसाठी महाआघाडीसोबत जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज ठाकरेंची देखील विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात भेट घेतली होती.
शेट्टी म्हणाले की, सरकारने कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे. तसेच बांगलादेशसाठी लावलेले निर्यात शुल्क माफ करावे. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना या भागात कांदे फेकून मारू, असे ते म्हणाले.
नांदगावमधील चांदोरे गावात वेळेत चारा छावणी सुरू न केल्याने 55 गायी मृत झाल्या आहेत. त्यामुळे या गायींच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गो हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
तसेच जिल्हा बँकेची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी नाहीतर वसुलीला येणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना पळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement