(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजू शेट्टींचं अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या 'या' प्रमुख मागण्या
सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय.
Raju Shetti : सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह सर्वच भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. द्राक्षे , कापूस , केळी , डाळींब , भाजीपालासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्यावी
वाढलेली महागाई , बाजारात ढासळलेले बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च याबरोबरच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळं शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळं केंद्र आणि देण्याची मागणी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज्यात झालेल्या या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या शेतकऱ्यांचे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. द्राक्ष आणि केळी पिकासाठीचा एकरी उत्पादन खर्च लाखो रुपयापर्यंत गेलेला आहे. हातातोंडाशी आलेले पिक जमिनदोस्त झाल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करुन संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे असल्याचे राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
...अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने पाहणी करुन राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर करुन केंद्र सरकारने तातडीचे मदत करण्याची मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने कर्जाचा बोजा वाढल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राजू शेट्टींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. सरकारने तातडीने पंचनामे पुर्ण करून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे.
राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: