543 पैकी 390 खासदार ग्रामीण भागातील, मात्र सरकारविरोधात कोणीच बोलत नाही; कारण... नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी
543 खासदारांपैकी 390 खासदार ग्रामीण भागातून येतात. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर (Rural Economy) सरकारच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नसल्याचे वक्तव्य राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं.
Raju Shetti : 543 खासदारांपैकी 390 खासदार ग्रामीण भागातून येतात. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर (Rural Economy) सरकारच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं आहे. ED, CBI, इन्कम टॅक्स यांच्या दबावामुळं समाजाचे प्रश्न मांडले जात नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील बावची इथं आयोजीत करण्यात आलेल्या प्रचारसभेत राजू शेट्टी (Raju Shetti) बोलत होते.
शेतकरी चळवळीनं तरुणांना अन्यायाच्या विरोधात लढण्यास शिकवलं
राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील यांचे आव्हान आहे. मात्र, या मतदारसंघातून मी विजयी होणार असल्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय. दरम्यान, शेतकरी चळवळीनं तरुणांना अन्यायाच्या विरोधात लढण्यास शिकवले आहे. घामाच्या दामाच्या लढाईमुळं ग्रामीण भागातील अर्थकारण बदलले आहे. यामुळं ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेवर प्रभाव टाकणारे बदल शेतकरी चळवळीमुळे झाल्याचे शेट्टी म्हणाले. केंद्र व राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत वेगवेगळी धोरणे राबवत आहे. यामुळं सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत असल्याची टिका राजू शेट्टी यांनी बावची येथील जाहीर सभेत केली.
सेंद्रीय शेतीमुळे उत्पादन कमी झाले तर भुकबळीचे प्रमाण वाढेल
शेतीतील उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा, संशोधन केंद्रे , विमा सरंक्षण या गोष्टींची उपलब्धता करणे गरजेचे होते असे राजू शेट्टी म्हणाले. देशामध्ये अन्नधान्य खाणारे दोन वर्ग आहेत. एक चवीसाठी व दुसरा पोटाची खळगी भरण्यासाठी. यामुळं जर देशात सेंद्रीय शेतीमुळे उत्पादन कमी झाले तर भुकबळीचे प्रमाण वाढेल असे राजू शेट्टी म्हणाले. देशातील 543 खासदारांपैकी 390 खासदार हे ग्रामीण भागातून येतात. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सरकारच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
सामान्यापर्यंतच्या योजना फक्त कागदावरच
सरकार कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेकडून वसुली करते. मात्र, त्याचा परतावा उद्योगपींची कर्जे राईट ॲाफ करण्यासाठी केली जाते ही शोकांतीका असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. सामान्यापर्यंतच्या योजना फक्त कागदावरच असून त्याची जाहीरातबाजी करण्यात येत आहे. देशामध्ये सर्वाधिक उद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कृषी, वस्त्रोद्योग व औद्योगीक क्षेत्राकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्यानेच बेरोजगारी वाढू लागली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Satej Patil on Raju Shetti : साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही; राजू शेट्टींची चर्चा कुठं अडली? सतेज पाटील काय म्हणाले??