एक्स्प्लोर
...तेव्हा भाजपला दुर्बीण लावूनही मित्र सापडणार नाहीत : राजू शेट्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्याचा खर्च कमी करून सॅटेलाईट सोडावं, राजू शेट्टींचं आवाहन

कोल्हापूर : भविष्यात भाजपला दुर्बिणीने शोधून पण मित्र पक्ष सापडणार नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते. राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. परंतु जनता त्यांना कधी वनवासात पाठवेल हे सांगता येत नाही. त्यावेळी मित्र कोण येणार, त्यावेळी त्यांना दुर्बीण लावून देखील मित्र सापडणार नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्याचा खर्च कमी करून सॅटेलाईट सोडावं. यामुळ शेतकऱ्यांना हवामानाची योग्य माहिती समजेल. मोदींचा एखादा परदेश दौरा कमी होईल. पण शेतकऱ्यांच भलं होईल.”, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तर कर्जमाफीची शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अपमान योजना असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
Before You Go
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















