एक्स्प्लोर
शिवसेनेचं संख्याबळ वाढलं, शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा
आघाडीने उमेदवारी डावल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले. त्यांनी तब्बल 90 हजार 38 मतं मिळवून, शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा 27 हजार 824 मतांनी पराभव केला.
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप-शिवसेना युतीमध्येच संख्याबळाची शर्यत गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेत आणखी एका अपक्ष आमदाराची भर पडली असून पक्षाचं संख्याबळ 64 वर पोहोचलं आहे. कोल्हापूरच्या शिरोळ मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी (4 नोव्हेंबर) रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
आघाडीने उमेदवारी डावल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले. त्यांनी तब्बल 90 हजार 38 मतं मिळवून, शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा 27 हजार 824 मतांनी पराभव केला. शिरोळ विधानसभा मतदारसंघात, शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील, महाआघाडीचे अनिल उर्फ सावकर मादनाईक, जनसुराज शक्ती पक्षाचे अनिलकुमार यादव आणि राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
अपक्ष आमदारांसाठी रस्सीखेच, शिवसेनेकडे 63 तर भाजपकडे 115 आमदारांचं संख्याबळ
राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानेच शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. "यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार," अशी ग्वाही राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. तसंच "शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार,"असं आश्वासनीही राजेंद्र पाटील यांनी दिलं.
शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची यादी (शिवसेना 56 + अपक्ष + इतर पक्ष = 64)
1. मंजुळा गावित (अपक्ष) : साक्री मतदारसंघ (धुळे)
2. चंद्रकांत पाटील (अपक्ष) : मुक्ताईनगर (जळगाव)
3. बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पार्टी) : अचलपूर (अमरावती)
4. राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी) : मेळघाट (अमरावती)
5. आशिष जैस्वाल (अपक्ष) : रामटेक (नागपूर)
6. नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) : भंडारा (भंडारा)
7. शंकरराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) : नेवासा (अहमदनगर)
8. राजेंद्र पाटील (अपक्ष) : शिरोळ (कोल्हापूर)
पक्षनिहाय जागा
भाजप : 105
शिवसेना : 56
राष्ट्रवादी काँग्रेस : 54
काँग्रेस : 44
बविआ : 3
एमआयएम : 2
प्रहार : 2
सपा : 2
रासप : 1
मनसे : 1
जनसुराज्य : 1
स्वाभिमानी पक्ष : 1
शेकाप : 1
माकप : 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष : 1
अपक्ष : 13
बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement