IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 05 Nov 2019 08:26 AM (IST)
Getty Image
मुंबई : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. परंतु निकाल लागून सहा दिवस उलटले आहेत, तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 105 जागा तर शिवसेनेने 56 जिंकल्या आहेत.
शिवसेना भाजप महायुती सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता आहे. परंतु मंत्रीपदांवरुन दोन्ही पक्षांमध्ये काही वादविवाद आहेत. दोन्ही पक्ष जास्तीत जास्त मंत्रीपदं स्वतःकडे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वाटाघाटीमध्ये आपआपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा, तसेच इतर लहान पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अपक्ष आमदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, आमदार एकनाथ शिंदे, सुभाष देसाई प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने आतापर्यंत सात आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 56 वरुन 63 इतके झाले आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आव्हाडे आणि अजून एक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपला आतापर्यंत 10 अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 105 वरुन 115 इतके झाले आहे. भाजप नेते गिरीश महाजन, जयकुमार रावल अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची यादी (शिवसेना 56 + अपक्ष + इतर पक्ष = 63) 1. मंजुळा गावित (अपक्ष): साक्री मतदारसंघ (धुळे) 2. चंद्रकांत पाटील (अपक्ष): मुक्ताईनगर (जळगाव) 3. बच्चू कडू(प्रहार जनशक्ती पार्टी) : अचलपूर (अमरावती) 4. राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी): मेळघाट (अमरावती) 5. आशिष जैस्वाल (अपक्ष): रामटेक (नागपूर) 6. नरेंद्र भोंडेकर (अपक्ष): भंडारा(भंडारा) 7. शंकरराव गडाख(क्रांतीकारी शेतकरी पक्ष) : नेवासा (अहमदनग)
भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची यादी (105 + 9 = 114) किशोर जोगेवार : चंद्रपूर विनय कोरे : शाहूवाडी विनोद अग्रवाल : गोंदिया महेश बाल्दी : उरण रवी राणा : बडनेरा राजेंद्र राऊत : बार्शी गीता जैन : मीरा-भाईंदर रत्नाकर गुट्टे : गंगाखेड श्यामसुंदर शिंदे : लोहा
बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा | ABP Majha
पक्षनिहाय जागा
भाजप 105 सेना 56 राष्ट्रवादी 54 काँग्रेस 44 बविआ 3 एमआयएम 2 प्रहार 2 सपा 2 रासप 1 मनसे 1 जनसुराज्य 1 स्वाभिमानी पक्ष 1 शेकाप 1 माकप 1 क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 अपक्ष 13
अपक्षांचा भाजपला पाठिंबा
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | रविवार
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगाव, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश