एक्स्प्लोर
राज ठाकरे राळेगणसिद्धीत, अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती
'या नरेंद्र मोदींचा 18 डिसेंबर 2013 रोजीचा ट्वीट आहे, लोकपाल बिल पास झालं पाहिजे, आमचा पाठिंबा आहे. पुढे पाच वर्ष होत आली, लोकपालबाबत काहीच कार्यवाही नाही', असं राज ठाकरे राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंच्या भेटीनंतर म्हणाले.
राळेगणसिद्धी, अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णा हजारेंना उपोषण सोडण्याची विनंती राज ठाकरेंनी केली. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान पाहिला नसल्याचा घणाघातही राज ठाकरेंनी केला.
अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. 8-9 तारखेपर्यंत सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर 'पद्मभूषण' परत करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी सरकारला दिला होता.
'अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सत्तेत बसलेले आहेत. आज खरं तर केजरीवालांनी इथे आंदोलनाला यायला हवं होतं. ज्यांच्यामुळे तो माणूस दिल्लीत सत्तेवर बसला आहे. नाहीतर कोण केजरीवाल, ओळखत तरी होतं का?' असं राज ठाकरे म्हणाले.
'अण्णांना म्हटलं कुठे या माणसांसाठी जीवाची बाजी लावता. सोडा हे उपोषण वगैरे' अशी गळ अण्णांना घातल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. मनसेकडून राज ठाकरेंनी अण्णा हजारेंच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला.
'या नरेंद्र मोदींचा 18 डिसेंबर 2013 रोजीचा ट्वीट आहे, लोकपाल बिल पास झालं पाहिजे, आमचा पाठिंबा आहे. पुढे पाच वर्ष होत आली, लोकपालबाबत काहीच कार्यवाही नाही', असंही राज ठाकरे म्हणाले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णांची भेट घेतली होती. मात्र त्यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. लोकपाल आणि लोकायुक्त नेमणुकीच्या संदर्भातल्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तुम्ही आश्वासन देऊन चालणार नाही अशी भूमिका अण्णा हजारेंनी घेतली होती.
राज्यात लोकयुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement