एक्स्प्लोर

Raj Thackeray : अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता

मनसे प्रमुख राज ठाकरे आज आपल्या विदर्भ दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात अकोल्यात येणार आहेत. दरम्यान, मनसे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात येत आहे.

Akola News अकोला : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज आपल्या विदर्भ दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात अकोल्यात (Akola News) येणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाशिमवरून राज ठाकरे अकोल्यासाठी निघाले आहेत. राज ठाकरे अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरच्या शुभमंगल कार्यालयात जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यावेळी ते अकोला जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा आढावा देखील घेणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या दोऱ्यानिमित्ताने मनसेनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलीये. 

दरम्यान, मागच्या महिन्यात मनसे (MNS) आणि  आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात येत आहे. परिणामी, या राड्यावर राज ठाकरे काही बोलतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटूंबियांनाही राज ठाकरे भेटतील  अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 2 वाजता ते अकोल्यातील बैठक आटोपून बुलडाणा जिल्ह्यातील शेगावकडे प्रयाण करतील, अशी माहितीही पुढे आली आहे.

राज्यात मनसेसाठी पोषक वातावरण - राज ठाकरे

महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येतं नाही. मात्र आगामी काळात त्यांच्यात तिकीट वाटपावरून इतक्या हाणामाऱ्या होतील की पक्ष बेजार होतील. एक झलक आपण लोकसभेच्या वेळी बघितली. प्रत्येकालाच निवडणुकीसाठी उभं राहायचं असल्याचे चित्र सध्या त्यांच्याकडे दिसत आहे. असेअसले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज्यात पोषक वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाअधिक जागा आम्ही लढणार असल्याचेही राज ठाकरे यापूर्वीच म्हणाले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार

1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर

हे ही वाचा 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sachin Pilgaonkar: ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?
ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?
Ajit Pawar Baramati By-Election: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचाली; निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचं पाऊल
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget