एक्स्प्लोर

सणासुदीच्या तोंडावर काढणीला आलेलं पीक गेलं, शेतकरीही लाडका असल्याचं सरकारनं दाखवून द्यावं: राज ठाकरे

Raj Thackeray : मराठवाड्यात झालेल्या पावसाचे जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

Raj Thackeray Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada)  झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी सरकारकडे मागणी केली आहे. समाजमध्यमांवर पोस्ट करत राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. 

त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील- राज ठाकरे

हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार राज्यासह मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, पावसामुळे अनेक प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र आहे. याच परिस्थितीवर भाष्य करत राज ठाकरे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारसह आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही सूचना दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं.

यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे, अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे. किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल. असा खोचक टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे. या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये. सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं. असेही ते म्हणाले.  

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget