Majha katta : राज ठाकरे भाषणाची तयारी नेमकी कशी करतात? शर्मिला ठाकरेंनी सांगितली सभेपूर्वीची स्थिती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाच्या आक्रमक शैलीमुळे सतत चर्चेत असतात. मात्र, राज ठाकरे भाषणाची तयारी नेमकी कशी करतात, याबद्दल त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले आहे.
Raj Thackeray Majha katta : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मशिदीवरील भोंगा प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाच्या आक्रमक शैलीमुळे सतत चर्चेत असतात. त्यांचं भाषण ऐकायला नागरिकांची मोठी गर्दी देखील असते. मात्र, राज ठाकरे भाषणाची तयारी नेमकी कशी करतात, याबद्दल राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच सभेला जाण्यापूर्वी नेमकी स्थिती कशी असते याबद्दल स्वत: राज ठाकरे यांनीच सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे
राज ठाकरे यांचे वाचन खूप आहे. ज्यावेळी त्यांची सभा असते त्यावेळी त्यांच्या रुममध्ये आम्ही कोणीही जात नसल्याचे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. कारण सभेच्या आधी ते वाचन करतात. त्यादिवशी काय बोलायचे याची तयारी सुरु असते. त्यामुळे आम्ही त्यांना कोणत्याही प्रकार डिस्टर्ब करत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज हे वाचून कधीच भाषण देत नाहीत. त्यांचे भाषण उत्स्फुर्त असते असेही देखील शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
सभेदिवशी हात-पायाला घाम फुटतो
ज्या दिवशी माझी सभा असते, त्यावेळेला माझ्या हात-पायाला घाम फुटलेला असतो. माझे हातपाय थंड पडलेले असतात. कारण मला माहिती नसते की मी काय बोलणार ते असे राज ठाकरे यांनी सांगितले. 100 गोष्टी जरी मला माहित असल्या तरी त्यावेळी माझ्या तोंडून काय येणार हे मला माहित नसते असेही राज म्हणाले. काही वेळेला नोट्स काढलेल्या असतात, पण माझे लक्ष जात नसल्याचे त्यांनी सांगितले. बोलतो त्यावेळी मला काही दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. जर एखादा महत्त्वाचा मुद्दा राहिला असेल तर मागून सांगितले जाते असेही राज ठाकरे म्हणाले.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यातील पहिला संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशी साधला. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray Majha katta : भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा : राज ठाकरे
- Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'बुस्टर डोस'! राज्यात महासभांचा धडाका