Raj Thackeray : राज ठाकरेंनी उद्या पुन्हा बोलावली बैठक, महायुतीबाबत महत्वाचा निर्णय होणार
Maharashtra Politics : मनसेच्या उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, उद्याच्या बैठकीत महायुतीसोबतच्या युती बाबत महत्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudipadwa) मेळाव्यातून महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठींबा दिला आहे. दरम्यान, या घोषणेनंतर त्यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी उद्या पुन्हा एक बैठक बोलावली आहे. उद्याच्या बैठकीत प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, उद्याच्या बैठकीत महायुतीसोबतच्या युती बाबत महत्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उद्या पुन्हा बैठक बोलावली आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारीच या बैठकीत उपस्थित असणार आहेत. उद्याच्या बैठकीत महायुतीशी संवाद साधण्यासाठी मनसेकडून समन्वयकांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या महायुतीसोबत जाण्याच्या हा पहिला पाऊल समजला जात आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्या सकाळी अकरा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत मनसेकडून महायुतीशी संवाद साधण्यासाठी कुणा-कुणाच्या नावाची घोषणा केली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार....
महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला असून, त्यानत्राची आज (13 एप्रिल) रोजी त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ज्यात मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
राज ठाकरेंच्या सभा होणार का?
मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या सभा प्रचंड गाजल्या होत्या. यावेळी राज ठाकरेंनी अनेक सभांमध्ये 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजपविरोधात अक्षरशः रान उठवले होते. राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेत नरेंद्र मोदी निशाण्यावर होते. मात्र, आता राज ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच महायुतीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता यंदाही राज ठाकरेंच्या सभा होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न यंदाही पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंची घोषणा; स्वतः शिंदे, फडणवीस, पवारांसाठी सभा घेणार?