कांद्याच्या घसरलेल्या किंमतीवरुन शरद पवारांवर मनसेचा निशाणा, अयोध्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
MNS vs NCP Twitter war : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले.
MNS vs NCP Twitter war : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले. कधी भोंग्यावरुन तर कधी महाआरतीवरुन राज ठाकरे चर्चेत राहिले. तसेच राज्यातील विविध ठिकाणी दौऱ्यालाही राज ठाकरे यांनी सुरुवात केली. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यभर चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता मनसेने कांद्याच्या किंमतीवरुन राज्य सरकारची गोची करण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरुन कांद्याल पाच पैशाचा भाव.. या हॅशटॅग खाली एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टला राष्ट्रवादीकडून जशास तसे उत्तर देण्यात आलेय.
मनसेने काय म्हटलेय? -
#कांद्याला_पाच_पैशाचा_भाव या हॅशटॅगसह मनसेने ट्वीटरवर पोस्ट केली आहे. यामध्ये कांद्याच्या किंमतीवर राज्य सरकारवर निशाणा साधलाय. फोटोमध्ये मनसेने एक बातमी पोस्ट करुन राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा फक्त जनहिताचा भोंगा!
महाविकास आघाडीविरोधातला भोंगा पुण्यात लावूच.. त्याचा आवाज मजोर सत्ताधाऱ्यांना भानावर आणेल! तोपर्यंत देशाच्या माजी कृषीमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो पाच पैशाचा भावच कसा मिळत राहील, याबाबत तुम्ही विचारविनिमय करत बसा.
असा खोचक टोला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना मनसेने लगावला. याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलेय. यामध्ये राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे, त्यावरुन निशाणा साधलाय. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच..असे ट्वीट राष्ट्रवादीने केलेय.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला, महाराष्ट्र सौनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच...
रविवारी 22 मे सकाळी दहा वाजता,, पुण्यात कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही फोटोमध्ये राष्ट्रवादीने म्हटलेय.
#कांद्याला_पाच_पैशाचा_भाव https://t.co/FFGY1bDOJV pic.twitter.com/mY8IUurUm1
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 20, 2022
सध्या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला असल्यानं आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत, सचिन सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.