अजबच! तब्बल नव्वद कंटेनर घेऊन जाणारी मालगाडी बेपत्ता, जाणून घ्या नेमकं काय घडलं
Rail Wagon Freight Train : तब्बल नव्वद केंटेनर घेऊन जाणारी रॅकवॅगन मालगाडी रेल्वेच्या सिस्टीमवरून गायब झाल्याचा प्रकास समोर आला आहे.
Railway News : नव्वद कंटेनर घेऊन जाणारी रॅकवॅगन मालगाडी बेपत्ता झाली आहे असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र रेल्वेच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑनलाईन सिस्टममध्ये ट्रॅक न झाल्याने मालगाडी बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली आहे. या घटनेमुळे रेल्वे विभागासह एक्सपोर्टर कंपन्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या घटनेनंतर शोधाशोध केल्यानंतर 1 फेब्रुवारीला निघालेली ही मालगाडी 14 फेब्रुवारी रोजी भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव येथे सापडली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र एक मालगाडी 10 दिवस रेल्वेच्या सिस्टमवरून बेपत्ता होते यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागपूरच्या वेगवेगळ्या एक्सपोर्टर कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी आपले कंटेनर नागपूर वरून मुंबईच्या जेनपीटी बंदरावर पाठवण्यासाठी रेल्वेला कॉन्ट्रक्ट दिले होते. 1 फेब्रुवारीला ही मालगाडी नव्वद कंटेनर घेऊन नागपूरवरून 4 फेब्रवारी रोजी जेएनपीटीला पोहचणार होती. मात्र, नागपूरवरून काही अंतर पार केल्यावर PJ102040201 ही मालगाडी रेल्वेच्या फ्लुईट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टमवर (FOIF) दिसणे बंद झाली. 4 फेब्रुवारीला पोहचारी ही मालगाडी कंटेनर घेऊन जेएनपीटी मुंबईला न पोहचल्याने एक्सपोर्टरने स्वत: शोधाशोध केली तर 14 फेब्रुवारी पर्यंत रेल्वेच्या सिस्टर मधून बेपत्ता आहे याची साधी कल्पनाही रेल्वेच्या नव्हती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली असता 1 फेब्रुवारीला निघालेली ही मालगाडी 14 फेब्रुवारीला भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव मध्ये उभी असल्याचे लक्षात आले.
विवो 2 - PJ102040201 या मालगाडीत तब्बल नव्वद कंटेनर होते. त्यामध्ये मनोरम एक्स्पोर्ट कंपनीचे बटर प्रॉडक्ट, भारती फूडचा राईस ,मॅगनीज ऑक्सिएड, सनफ्लॅगचे स्टील बार यासह इतर एक्सपोर्टर साहित्य होते. कॉंन्कर कंपनीच्या ढिसाळ कारभाराने एक्सपोर्टरचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. जो माल या एक्सपोर्टरला आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया या खंडात पाठवायचा होता तो तर उशिरा पोहचेल, सोबतच शिप बुकिंग मिस झाल्याने त्यांना आपला एक्स्पोर्ट करायला आता अतिरिक्त खर्च द्यावा लागेल. पण त्यापेक्षाही गंभीर विषय म्हणजे एखादी मलागाडी रेल्वेच्या सिस्टम वरून दहा दिवस बेपत्ता असते आणि रेल्वे प्रशासन व कॉंन्कर कंपनीला याची साधी कल्पना पण नसने हे खूप गंभीर असल्याचे कंटेनर मालकांचे मत आहे.
दरम्यान, या संदर्भात एबीपी माझाने कॉंन्कर कंपनीचे चीफ मॅनेजर संतोष कुमार सिंग यांना विचारले असता त्यांनी भुसावळ डिव्हिजनमध्ये शेगाव जवळ 14 फेब्रुवारीला ही ट्रेन मिळाल्याचे सांगितले. पण घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी कॅमेरावर बोलायला नकार दिला.
प्रश्न फक्त एक मालगाडी बेपत्ता होण्याचा पुरते मर्यादित नाही तर रेल्वेचे सिक्युरिटी सिस्टम काय करत होते? एक मालगाडी 10 दिवसापासून संपर्काच्या बाहेर आहे तर हे मध्य रेल्वे व कॉंन्कर कंपनीला हा प्रकार वेळेत का कळला नाही? एखाद्या प्रवाशी ट्रेन सोबत असे झाले असते तर ? या सर्व प्रश्नावर सुरक्षा यंत्रणा व मध्य रेल्वेला भविष्यात विचार करावा लागणार आहे.