एक्स्प्लोर

भाकरी नसणं, रक्त येणं यात नवीन काय? : रघुनाथ पाटील

खायला भाकर नसणं, रक्त येणं हे तर होतंच असतं, यात नवीन काही नाही, अशा शब्दात रघुनाथ पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं.

मुंबई : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्या रघुनाथ पाटलांनी किसान मोर्चाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. खायला भाकर नसणं, रक्त येणं हे तर होतंच असतं, यात नवीन काही नाही, अशा शब्दात रघुनाथ पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं. किसान सभेच्या मागण्यांवरुनही राजकारण रंगतंय. नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करत हजारो श्रमिकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईची वाट धरली. सरकारला गुडघ्यावर आणत कष्टकऱ्यांच्या अन्यायाला आवाज मिळवून दिला. मात्र शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांनीच या वेदनेची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे. हा कार्यक्रम सुकाणू समितीकडून आयोजित केला असता तर वेगळं महत्त्व आलं असतं, असंही रघुनाथ पाटलांनी बोलून दाखवलं. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, आता बाकी मागण्यांसाठी आम्ही वेगळं आंदोलन करु, असंही ते म्हणाले. मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून का नाही घेतल्या, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, ''अशा उन्हात शेतकऱ्यांना चालवलं कशाला? नाशिकलाही यावर तोडगा निघाला असता. मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता की मंत्र्यांना? या मोर्चामागे निव्वळ राजकारण आहे. मुख्यमंत्री राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं हे दाखवायचं आहे. याने काही होणार नाही, जनता आता हुशार झाली आहे,'' असं उत्तर रघुनाथ पाटलांनी दिलं. किसान सभेच्या मोर्चात सुकाणू समिती सहभागी का नाही झाली, यावरही रघुनाथ पाटलांनी उत्तर दिलं. ''त्यांच्या पक्षात आम्ही का जायचं, असा उलट सवाल त्यांनी केला. प्रत्येक पक्षाचा वेगळा अजेंडा असतो. सुकाणू समितीमध्ये सर्व संघटनांचे कार्यकर्ते आहेत. हा त्यांचा वैयक्तिक मोर्चा होता,'' असंही ते म्हणाले. तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळालं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळात झालेल्या बैठकीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. लेखी आश्वासनानंतर किसान लाँग मार्च मागे घेण्यात आला. सकारात्मक बैठकीनंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा आंदोलनकांनी केली. आझाद मैदानावर मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना सरकारसोबत झालेल्या चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला. लेखी आश्वासन, कालमर्यादा आणि सर्व मागण्या विधानसभेच्या पटलावर ठेवण्याचं मंजूर केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला होता. अखेर या तीनही गोष्टी मिळवल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या

Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget