एक्स्प्लोर

पुणतांबा आंदोलन, चौघांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनातील आंदोलनकर्त्यां मुलींची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यास पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी आले होते.

पुणतांबा (अहमदनगर) :  पुणतांबा येथील कृषीकन्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र या मुलींना उपचारासाठी दाखल करताना प्रशासनाला विरोध करणारांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणतांबा अन्नत्याग आंदोलनातील आंदोलनकर्त्यां मुलींची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यास पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी आले होते. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या  धनंजय जाधव, प्रताप वहाडणे, हेमंत कुलकर्णी आणि अन्य एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या चौघांना राहाता कोर्टात  होते.  कोर्टाने या चौघांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 मुलींचा सरकारला तळतळाट लागेल- शेट्टी   
दरम्यान, पुणतांब्यांच्या मुलींचा उपोषणाचा तंबू सरकारने दबावाने मोडीत काढला असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.  ही सरकारची दडपशाही असून हे  निषेधार्ह आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. उपाशीपोटी आंदोलन केलेल्या मुलींचा सरकारला तळतळाट लागेल, असेही शेट्टी म्हणाले.
उपोषणामुळे किडणीवर परिणाम, पुणतांब्यातील कृषीकन्यांचं उपोषण मागे शेतमालाला हमीभाव, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुधाला 50 रुपये प्रतिलिटर भाव यासह अन्य मागण्यांसाठी कृषीकन्यांनी सुरु केलेलं उपोषण आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.  उपोषणामुळे किडणीवर परिणाम होत असल्यानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतले. मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवसात पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलक मुलींनी दिला आहे. पुणतांब्यात कृषीकन्या गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत होत्या. दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ   पुणतांबा गावातून युवतींनी एकत्र येत सरकार विरोधात एल्गार पुकारला होता.  पुणतांबा गावातील शुभांगी जाधव, निकिता जाधव व पूनम जाधव या शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या तीनही मुलींची कालच तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी बळजबळीने मुलींच्या या आंदोलनावर कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईला आंदोलक मुलींनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यावेळी आंदोलक धनंजय जाधव यांच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतलं. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुणतांब्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणतांबा गावातून 'देता की जाता' असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरु आहे. तर दुसरीकडे पुणतांबामधील कृषीकन्याही आक्रमक झाल्या आहेत. सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे. दरम्यान या आंदोलनासाठी विविध संघटनांनी मुलींची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. ग्रामस्थांनी भीक मांगो आंदोलन करत भीक मागून मिळणारा निधी मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डरने पाठवला आहे. नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा देत गाव कडकडीत बंद ठेवलं होतं. पुणतांबा गावातील शाळकरी मुलींनी आंदोलनात सहभाग घेत आंदोलन करणाऱ्या मुलींच्या समर्थनार्थ गावातून काळे झेंडे घेऊन फेरी काढली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget