पुणतांबा कृषीकन्यांच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई
शेतमालाला हमीभाव, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुधाला 50 रुपये प्रतिलिटर भाव यासह अन्य मागण्यांसाठी पुणतांब्यात मुलींचं उपोषण सुरु आहे.
शिर्डी : पुणतांब्यात कृषीकन्या गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या तीनही मुलींची काल तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी बळजबळीने मुलींच्या या आंदोलनावर ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईला आंदोलक मुलींनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला. त्यावेळी आंदोलक धनंजय जाधव यांच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुणतांब्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेतमालाला हमीभाव, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुधाला 50 रुपये प्रतिलिटर भाव यासह अन्य मागण्यांसाठी पुणतांब्यात मुलींचं उपोषण सुरु आहे.
पुणतांबा गावातून 'देता की जाता' असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरु आहे. तर दुसरीकडे पुणतांबामधील कृषीकन्याही आक्रमक झाल्या आहेत.
सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे.